कर भरण्याचे माणगाव नगर पंचायतीचे आवाहन
माणगाव (वार्ताहर) ः माणगाव नगर पंचायतीकडून नागरिकांनी प्रलंबित कर वेळेत भरून शहराच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याधिकारी संतोष माळी यांनी केले आहे. नगर पंचायतीच्या विविध विकासकामांसाठी कर हा प्रमुख स्रोत असून, नागरिकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून कर भरणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असते. नागरिकांकडून वेळेत करवसुली झाल्यास ही कामे अधिक गतीने आणि प्रभावीपणे राबविता येतात. त्यामुळे थकबाकीदार नागरिकांनी विलंब न करता आपले कर भरावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. माणगांव नगर पंचायतीवर सुमारे ६० लाख रुपयांची कर थकबाकी असल्याचे समोर आले असून, अशा परिस्थितीत नगर पंचायतीचे दैनंदिन कामकाज आणि विकासकामे कशी चालवायची, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.