मुंबई

बासरी-पखवाजाची सुरेल जुगलबंदी

CD

बासरी-पखवाजची सुरेल जुगलबंदी

मुंबई, ता. २१ ः कीर्तन, हरिपाठ, टाळ-मृदंगाच्या गजरामध्ये श्रीगुरू पादुका दर्शन सोहळा पार पडत असतानाच उपस्थित भक्तांनी बासरी- पखवाजची सुरेल जुगलबंदी अनुभवली. श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवात दोन तरुण कलाकारांनी आपल्या अप्रतिम कलेने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सिद्धेश अरुण म्हात्रे (तरघर, बासरीवादक) आणि सिद्धांत विजय म्हात्रे (उलवे, पखवाजवादक) यांनी सादर केलेल्या सुरेल जुगलबंदीने संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि भारावलेले झाले.
बासरीवादनात १० वर्षांचा अनुभव असलेल्या सिद्धेश म्हात्रे यांनी आपल्या साधनेतून एक वेगळीच उंची गाठली आहे. त्यांनी लक्ष्मण कवाटे, नंदकुमार सुतार आणि वैष्णवी जोशी यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आहे. सध्या ते वृंदावन गुरुकुल येथे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या यशामागे कुटुंबाचा मोठा वाटा असून, वडील दर रविवारी त्यांना अंधेरी येथे क्लाससाठी घेऊन जात असत आणि कोणताही अभ्यासाचा ताण न देता त्यांनी मुलाच्या कलेला प्रोत्साहन दिले. दुसरीकडे, सिद्धांत विजय म्हात्रे यांनी पखवाज वादनात आपली खास ओळख निर्माण केली आहे. ते गेल्या सात-आठ वर्षांपासून सुहास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेत आहेत. लहानपणापासूनच संगीताची आवड असलेल्या सिद्धांत यांना त्यांच्या घरातील सांस्कृतिक वातावरणाचा वारसा लाभला आहे. त्यांच्या मोठ्या वडिलांकडून अभंग ऐकतच त्यांनी पखवाज वादनाची सुरुवात केली.
या दोन्ही कलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमामुळे उपस्थित भक्तगण तल्लीन झाले. बासरीच्या मधुर स्वरांसोबत पखवाजच्या दमदार ठेक्यांनी उत्सवाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या तरुण कलाकारांच्या कलेमुळे श्रीगुरू पादुका सोहळा संस्मरणीय ठरला. ‘आम्हाला इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर आमची कला सादर करण्याची संधी मिळाली, याचा आनंद आहे,’ अशी प्रतिक्रिया सिद्धेश आणि सिद्धांत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

मोखाड्यात "घर घर संविधान" उपक्रमांतर्गत भीमगीतांची जल्लोषात मैफिल; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर नाराजी

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : सहा आमदारांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले

SCROLL FOR NEXT