विदेशी पर्यटकांची माहिती लपवणे महागात
नवी मुंबई, ता. २१ (वार्ताहर) : सानपाड्यातील एका लॉजमध्ये विदेशी पर्यटकांची माहिती पोलिसांना न देता त्यांना राहण्याची सोय करून देण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी लॉज मालक आणि मॅनेजरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सानपाडा सेक्टर-५ मधील ‘ओपल कम्फर्ट्स’ या लॉजमध्ये २८ ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत तुर्की देशातील दोन पुरुष आणि दोन महिला पर्यटक वास्तव्यास होते. नियमानुसार, परदेशी नागरिकांची नोंदणी फॉरेनर्स रजिस्ट्रेशन ऑफिसर यांच्या वेब पोर्टलवर सी-फॉर्म भरून करणे बंधनकारक आहे. मात्र, लॉज व्यवस्थापनाने ही प्रक्रिया पूर्ण केली नव्हती. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री सानपाडा पोलिसांनी त्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवले. या वेळी संबंधित लॉजचे रजिस्टर तपासताना डिसेंबर महिन्यात थांबलेल्या विदेशी पर्यटकांची माहिती पोलिसांना कळवण्यात आली नसल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी लॉज मालक सिद्धेश कोडक (३६) आणि मॅनेजर अजर ताहिर उद्दीन (२२) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.