कलाकारांच्या प्रतिक्रिया
स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन मला लाभले, यामागे स्वामींचीच कृपा आहे. साईबाबा आणि स्वामी समर्थांना मी खूप मानते. त्यांच्या आदेशानुसारच चालण्याचा प्रयत्न करते. घरातच आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे मुलांना वेगळे सांगावे लागत नाही. गेल्या वर्षी काही कामामुळे पादुका दर्शन साेहळ्याची संधी हुकली होती. या वर्षी हा अतिशय दुर्मिळ योग अनुभवता आला, याबाबत मी ‘सकाळ’ची आभारी आहे.
- प्रिया बेर्डे, अभिनेत्री
..............
आम्ही संत- महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी आलो आहोत. आजचा दिवस आध्यात्मिकतेने सुरू झाला. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, श्री स्वामी समर्थ आणि बऱ्याच संतांच्या पादुकांचे दर्शन घेता आले. या धावपळीच्या जीवनात असा ‘स्पिरिच्युअल पॉज’ मिळाला की खूप शांतता वाटते. ‘सकाळ’च्या टीमने आयोजन खूप छान केले आहे. माझ्यासाठी भक्ती आणि श्रद्धा म्हणजे माझे काम आहे. मी जेव्हा नाटकात आणि कॅमेऱ्यासमोर अभिनयात पूर्ण गुंतलेला असतो, तेव्हाच मला देवाच्या जवळ असल्यासारखे वाटते.
- अभिनय बेर्डे, अभिनेता
...............
आजकालच्या धावपळीत शूटिंग आणि कामांमुळे परमेश्वराचे दर्शन घ्यायलाही वेळ मिळत नाही. आपण बहुतेक वेळी देऊळ दिसले की हात जोडून आशीर्वाद घ्यायचो; पण आता तेही क्वचित होते. आज आणि उद्या एकाच ठिकाणी २१ महासंतांच्या पादुकांचे दर्शन मिळणे, ही खूप मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे. येथे येऊन मनाला खूप शांतता आणि समाधान मिळाले. जणू संत-महंतांचा आशीर्वाद मिळाल्याची भावना निर्माण झाली. आतून खूप स्वच्छ आणि प्रसन्न वाटत आहे. आता नवरात्रही सुरू आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, इथे येऊन या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्या.
- विजय पाटकर, अभिनेता
....................
खूप छान आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते आहे. सगळ्या महान संतांच्या, ज्यांना आपण गुरू मानतो, त्यांच्या पादुका येथे एकाच ठिकाणी प्रतिष्ठापित केल्या आहेत. साधारणपणे आपल्याला यांचे दर्शन घ्यायला शेगाव किंवा अक्कलकोट अशा वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे ही खरोखर भाग्याची गोष्ट आहे. आपले मराठी नववर्षही नुकतेच सुरू झाले आहे आणि या नव्या वर्षाची सुरुवात देवांच्या आणि संतांच्या दर्शनाने होणे, ही खूपच शुभ गोष्ट आहे. या संपूर्ण भक्तिमय वातावरणाने मी अक्षरशः भारावून गेले आहे.
- पल्लवी वैद्य, अभिनेत्री
......................
नमस्कार, आपल्या महाराष्ट्राला थोर संत-सद्गुरूंची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. अशा संत आणि सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन मला मिळाले, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. देशभरातून आलेल्या संतांच्या पादुकांचे एकत्र दर्शन आज येथे क्रीडांगणात घेता आले, ही माझ्यासाठी खूप खास आणि भावुक करणारी गोष्ट होती. अशी संधी खरंच क्वचितच मिळते. मनाला एक वेगळीच शांतता आणि समाधान मिळालं... आणि माझ्यासाठी माझा गुरू म्हणजे निसर्ग, कारण तो कधीही कोणावर भेदभाव करत नाही.
- निखिल राजेशिर्के, अभिनेता
.....................
आम्ही दोघांनीही ‘श्री पादुका दर्शन उत्सव’ या ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या भक्तीच्या महाकुंभाला आज भेट दिली. येथे येण्याचा आमचा अनुभव अत्यंत अद्भुत होता. महाराष्ट्राला लाभलेली ही महान संतपरंपरा खरोखरच अभिमानास्पद आहे. या सर्व संत-महात्म्यांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी कदाचित आपल्याला संपूर्ण भारतभर फिरावे लागेल; परंतु ‘सकाळ’ने आयोजित केलेल्या या सोहळ्यामुळे एकाच ठिकाणी २१ संत- महात्म्यांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळणे, म्हणजे खरोखरच हा भक्तीचा महाकुंभ आहे. मी सर्वांना आवाहन करीन, की मोठ्या संख्येने येथे या, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही. ‘साधु संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ असे आपण नेहमी म्हणतो; आता ती प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे, असे मला वाटते.
- प्रणव रावराणे, अमृता रावराणे
................
संत परंपरेचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात जन्म मिळणे, ही अभिमानाची गोष्ट आहे. आज वरळीमध्ये २१ संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा योग आला. त्यासाठी ‘सकाळ’ समूहाचे आभार. या दर्शनातून मनाला खूप शांतता आणि आत्मिक समाधान मिळाले. माझ्यासाठी श्रद्धा म्हणजे अहंकार नसलेली भावना आणि समाजसेवा आहे; पण ती अंधश्रद्धा नाही, तर विज्ञानासोबत असावी. माझी सर्वांना विनंती आहे, या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घ्या.
- नम्रता गायकवाड, अभिनेत्री
.................
श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव खूपच कमाल आहे. मी कल्पनाही केली नव्हती की एकाच व्यासपीठावर, एकाच छताखाली मला महान गुरूंचे दर्शन आणि त्यांच्या पादुकांचे दर्शन घेण्याची संधी मिळेल. मी खूप हरखून गेलो आहे. हा आनंद शब्दांत मांडणे कठीण आहे. तो प्रत्यक्ष अनुभवणे आवश्यक आहे. अनेक गुरूंची नावे मला माहिती होती; पण काहींबद्दल माहिती नव्हती. ती इथे आल्यावर समजली. आजच्या पिढीपर्यंत ही माहिती पोहोचणे गरजेचे आहे. तरच आपला वारसा पुढे चालत राहील. त्यामुळे असे सोहळे होत राहायला हवे. मी ‘सकाळ’चे मनापासून आभार मानतो. येथे येऊन खूप वेगळी आणि आनंददायी अनुभूती मिळाली.
- अतुल श्रीवास्तव, अभिनेता
...................
खूप सुंदर अनुभव आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे. त्यांच्या शिकवणीचा आपल्याला खूप फायदा होतो. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणे शक्य नसते; पण अशा वेळी संतांच्या पादुकांचे एकत्र दर्शन मिळणे, ही खूप मोठी संधी आहे. येथे आल्यावर जो आनंद आणि शांतता मिळते, तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसतो. भक्ती आणि श्रद्धा प्रत्येकासाठी वेगळी असते. कोणी पूजापाठातून समाधान शोधते, तर कोणी नामस्मरणातून. शेवटी सगळ्यांना हवे असते ते भक्तीचे समाधान. माझ्यासाठी माझे गुरू म्हणजे स्वामी. लहानपणापासून घरात त्यांच्यावर श्रद्धा आहे. आजही मी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. जसे आपल्या अडचणीच्या वेळी कुटुंब साथ देते, तसे स्वामीही माझ्या पाठीशी कायम उभे असतात.
- अक्षय मुडावदकर, अभिनेता
...................
श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाला येऊन खूप प्रसन्न वाटत आहे. सर्व संतांच्या, साक्षात् परब्रह्म स्वामींच्या पादुका येथे आलेल्या आहेत. या पादुकांचे दर्शन घेऊन मनाला इतकी शांतता वाटत आहे, की असे वाटते येथून खरेच जाऊ नये. मन इथेच रमले आहे. इतके प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण येथे आहे.
- दिगंबर फासाटे, ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचे दिग्दर्शक
................
श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव, भक्ती आणि शक्ती व्यासपीठ या भव्य कार्यक्रमाबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. चैत्र नवरात्राच्या निमित्ताने हा दर्शन सोहळा अनुभवायला मिळणे, ही माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. असा योग मनात आणूनही सहज जुळून येत नाही, तो तुम्ही घडवून आणलात, त्याबद्दल धन्यवाद. सर्व मुंबईकरांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा आणि गुरुभक्तीत तल्लीन व्हावे, असे मी आवाहन करतो.
- सुशांत शेलार, अभिनेता
..................
वरळीमध्ये पादुका दर्शनासाठी आलो होतो. ‘सकाळ’ने आयोजित केलेला हा उपक्रम खरोखरच उत्कृष्ट आहे. हा एक भक्तीचा महाकुंभच आहे. प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाने आणि इतर सर्वांनीही येथे येऊन या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा.
- नरेश बोर्डे, निर्माते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.