मुंबई

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू

CD

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू

मनोर, ता. २१ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाघोबा खिंड परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेनंतर चालक फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील ढेकाळे येथील वाघोबा खिंड परिसरात शनिवारी सायंकाळी भीषण अपघात घडला. अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास मुंबई वाहिनीवर घडला. दुचाकीवरील तिघे मुंबईच्या दिशेने जात असताना वाघोबा खिंड परिसरात अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर तिघांनाही वाहनाने चिरडल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला.

मनोर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. सध्या मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, त्यांच्या नातेवाइकांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, अपघात करून पसार झालेल्या वाहनाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

मोखाड्यात "घर घर संविधान" उपक्रमांतर्गत भीमगीतांची जल्लोषात मैफिल; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर नाराजी

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : सहा आमदारांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले

SCROLL FOR NEXT