मुंबई

चिमुकलांच्या भक्तिगीतांनी भाविक मंत्रमुग्ध

CD

चिमुकल्यांच्या भक्तिगीतांनी भाविक मंत्रमुग्ध

मुंबई, ता. २१ : विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी भाविक मंत्रमुग्ध झाले. सुमारे तासभर रंगलेल्या या कार्यक्रमाने वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले.
दादर येथील साने गुरुजी इंग्रजी शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीतील सुमारे ४० विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक मोहन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘विठ्ठल नामाचा गजर’, ‘आईसारखे दैवत’, ‘स्वामी समर्थ’, ‘दत्ताचे गीत’ अशी भक्तीगीते सादर केली. कार्यक्रमाची सांगता ‘पसायदान’ने करण्यात आली. या शाळेमध्ये गाण्याची स्वतंत्र तासिका असून, इयत्ता तिसरीपासूनच गायनाचे धडे दिले जातात. त्यानंतर शारदाश्रम मराठी शाळा आणि एसव्हीएम इंटरनॅशनल स्कूलमधील इयत्ता पाचवी ते नववीतील २० ते २५ विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षिका भक्ती मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमधुर भक्तिगीते सादर केली. ‘विठ्ठल...’, ‘देह देवाचे मंदिर’, ‘पांडुरंग... पांडुरंग...’ या गीतांनी वातावरण अधिकच भारावून गेले. या वेळी शारदाश्रम शाळेचे सचिव गजेंद्र शेट्टी यांनी ‘सकाळ’ने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाबद्दल आभार व्यक्त केले. अशा प्रकारच्या व्यासपीठावर कार्यक्रम सादर करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगत हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील वर्षी अधिक जोमाने सहभाग घेऊन कार्यक्रम अधिक भक्तिमय करण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''योनी पूजनाचे धक्कादायक व्हिडीओ...'', नेत्याचा खळबळजनक दावा, कॅप्टन खरात नेमकं करायचा तरी काय?

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

तरडे–शिंदवणे रस्त्यावर स्ट्रीट लाईटची मागणी; अपघात टाळण्यासाठी नागरिकांची पुढाकार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार; एक जण गंभीर जखमी

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

SCROLL FOR NEXT