मुंबई

विविध स्टाॅलकडे भाविकांची पावले

CD

विविध स्टाॅलकडे भाविकांची पावले

आध्यात्मिक पुस्तके, आयुर्वेदिक उत्पादनांना पसंती

मुंबई, ता. २१ : श्रीगुरू पादुका दर्शन साेहळ्यानिमित्त विविध प्रकारचे स्टाॅल लावण्यात आले आहेत. पौष्टिक खाद्य आणि विचारांना चालना देणारे पुस्तकांचे स्टाॅल दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या स्टाॅलकडे भाविकांची पावले आपसूक वळत असून तेथील उत्पादनांची आवर्जून माहिती घेताना दिसत आहेत. पुस्तके चाळत असल्याचे स्टाॅलधारकांनी सांगितले.

फेथफूड्स, संतुलन आयुर्वेदिक, चिन्मय मिशन आणि पुणे ब्लाइंड स्कूल यांचे स्टाॅल लावण्यात आले आहेत. ‘फेथफूड्स’ या ऑरगॅनिक फार्म ब्रँडच्या स्टाॅलचे यशराज घाेरपडे म्हणाले, ‘फेथफूड्‌स हा सेंद्रिय व नैसर्गिक खाद्यपदार्थांचा स्टॉल आहे. येथे विविध प्रकारचे शुद्ध व नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले खाद्यपदार्थ ठेवण्यात आले आहेत. विविध प्रकारचे धान्य, तूप, लाकडी घाण्यावरचे शेंगदाणा तेल, विविध प्रकारचे बीज, मसाले, तेल, स्नॅक्स तसेच इतर सेंद्रिय उत्पादनांचा त्यात समावेश आहे.’

‘क्लीन इनग्रेडिएंट्‌स, ऑनेस्ट साेर्सेस’ आणि ‘गुडनेस स्ट्रेट फ्राॅम अवर फार्म्‌स’ ही आमची घोषवाक्ये आहेत. आम्हाला पादुका दर्शन सोहळ्यामध्ये स्टॉल लावायची संधी मिळाली आहे. आमच्या दृष्‍टीने ही लोकांची सेवाच आहे. या भक्तिमय वातावरणात आम्हाला चांगले अन्न, खाद्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळालेली आहे. याबद्दल ‘सकाळ’चे आभार मानताे, असे घाेरपडे म्हणाले.

३० वर्षांपासून आम्ही आयुर्वेदिक उत्पादने विक्री करत आहोत, असे संतुलन आयुर्वेदिकच्या सुचिता देशमुख म्हणाल्या. पादुका दर्शन सोहळ्याचे हे आमचे तिसरे वर्ष आहे. अतिशय सुंदर व्यवस्था, धार्मिक वातावरण येथे तयार करण्यात आलेले आहे. या ठिकाणी आम्हाला स्टॉल लावून आमचे आयुर्वेदिक उत्पादन विक्री करण्याची संधी मिळाली आहे. आमची उत्पादने ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांना उपयुक्त आहेत. च्यवनप्राश, डोळ्यांकरिता, पित्तासाठी, सांधेदुखीसाठी, संपूर्ण शरीरासाठी आमची उत्पादने बाजारात व ऑनलाइन उपलब्ध आहेत. येथे आमच्या या आयुर्वेदिक उत्पादनांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे देशमुख म्हणाल्या.

‘चिन्मय मिशन’ भगवद्‌गीता, उपनिषदे आणि अध्यात्मावर आधारित अनेक उत्कृष्ट पुस्तके प्रकाशित करते. या संस्थेच्या स्टाॅलवर उपस्थित स्वयंसेवक नागरिकांना पुस्तकांची माहिती देत आहेत. या प्रदर्शनादरम्यान अनेकांनी आध्यात्मिक ग्रंथांची खरेदी करून जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा संकल्प व्यक्त केला. आज आम्हाला श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवामध्ये पुस्तके विक्री करण्याची संधी मिळाली आहे. नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे ‘चिन्मय मिशन’चे भगवत श्री यांनी सांगितले.
----------
कोथरूड येथील पुणे ब्लाइंड स्कूल या शाळेतील मुलींनी तयार केलेली उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. मेणबत्ती, पणत्या, विविध प्रकारच्या पिशव्या यांचा समावेश आहे. या उत्पादनांच्या विक्रीतून मिळणारा फायदा अंध मुलींच्या खात्यात जाणार आहे. ‘कमवू आणि शिकू’ हा उपक्रम शाळेतर्फे राबवला जाताे. श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात आम्हाला आणि आमच्या अंध मुलींना त्यांची विविध उत्पादने विक्री करण्यासाठी संधी दिल्याबद्दल ‘सकाळ’चे खूप खूप आभार.
- अमित चंद्रकांत काशीद, पुणे ब्लाइंड स्कूल
-------
‘चिन्मय मिशन’ भगवद्‌गीता, उपनिषदे आणि अध्यात्मावर आधारित अनेक उत्कृष्ट पुस्तके प्रकाशित करते. स्वामी चिन्मयानंद आणि स्वामी तेजोमयानंद यांच्या मार्गदर्शनाखालील ही पुस्तके जीवन जगण्याची कला, भक्ती आणि ज्ञान देतात. या स्टॉलवर भगवद्गीता, उपनिषद, तसेच विविध संतांच्या विचारांवर आधारित मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व वयोगटांसाठी उपयुक्त साहित्य येथे उपलब्ध आहे. ‘भक्ती आणि ज्ञान ही अनमोल धरोहर’ या संदेशातून समाजात सकारात्मक विचारांचा प्रसार करण्याचा उद्देश आहे.
- भगवत श्री (चिन्मय मिशन)

Pune Accident : पुण्यातील दरी पूल परिसरात पहाटे भीषण अपघात , चार वाहने एकमेकांना धडकली अन्...

UP News : ‘फरसा वाले बाबा’ मृत्यू प्रकरण: अपघात की घातपात? मथुरेत हायवेवर राडा, CM योगी आदित्यनाथ यांचा कडक इशारा

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Nanded News: नांदेडमध्ये दुचाकीचा भीषण स्फोट; चालकाचा मृत्यू

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

SCROLL FOR NEXT