मुंबई

४५ दिव्यांगांना मिळाला आध्यात्मिक उर्जेचा स्पर्श

CD

सेवा, भक्ती अन् संवेदनशीलतेचा संगम
४५ दिव्यांगांना मिळाला आध्यात्मिक ऊर्जेचा स्पर्श

मुंबई, ता. २१ : भक्ती, सेवा आणि संवेदनशीलतेचा संगम अनुभवायला मिळाला तो ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवा’त! आधारिका फाउंडेशनच्या पुढाकारातून तब्बल ४५ दिव्यांगांना या भव्य आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ मिळाल्याने त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण साकार झाला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि डोळ्यांतील समाधान पाहून उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून गेले. ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘भक्ती-शक्ती व्यासपीठा’तर्फे आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात यंदा एक हृदयस्पर्शी प्रसंग पाहायला मिळाला. आधारिका फाउंडेशनचे विनायक मोरे, प्रसाद मोरे, प्रदीप पांचाळ, अश्विनी खरे, नीलिमा पाटील, रूपाली मोरे आणि तनिषा मोरे यांच्या पुढाकारातून विरार, बदलापूर, कल्याण, वसई, वांगणी आणि कांदिवलीच्या ४५ दिव्यांग बांधवांना या सोहळ्यात सहभागी करून घेण्यात आले. या दिव्यांगांसाठी हा केवळ दर्शनाचा कार्यक्रम नव्हता, तर एक नवा आध्यात्मिक अनुभव ठरला. अनेकांनी प्रथमच इतक्या मोठ्या भक्तिमय वातावरणात सहभाग घेतला. श्रीगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेताना काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रू, तर काहींच्या चेहऱ्यावर समाधानाची झळाळी स्पष्टपणे दिसून येत होती. काहीं अंध दिव्यांगांनी पादुकांना स्पर्श करून श्रद्धा व्यक्त केली, तर काहींनी डोळे मिटून मनोमन आशीर्वाद मागितला. एरवी सार्वजनिक ठिकाणी जाणे दिव्यांग व्यक्तींसाठी अनेकदा आव्हानात्मक ठरते; मात्र पादुका सोहळ्यातील व्हीलचेअरची उत्तम व्यवस्था, गुरुसेवकांची मदत आणि भक्तिमय वातावरणामुळे हा अनुभव अधिक सुखद ठरला. आयोजकांच्या संवेदनशीलतेमुळे प्रत्येक दिव्यांग बांधवाला सन्मानाने आणि सुलभतेने दर्शन घेता आले.
२०१८ पासून दिव्यांगांसाठी कार्यरत असलेल्या आधारिका फाउंडेशनसाठी हा दिवस विशेष भावनिक ठरला. ‘हा केवळ सामाजिक उपक्रम नाही, तर गुरुकृपेचा आशीर्वाद आहे,’ अशी भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांना आध्यात्मिक ऊर्जेचा अनुभव देण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. भविष्यातही अशा उपक्रमांच्या माध्यमातून अधिकाधिक दिव्यांग नागरिकांना सहभागी करून घेण्याचा निर्धार संस्थेने व्यक्त केला आहे. हा सोहळा दरवर्षी व्हावा आणि अधिकाधिक दिव्यांग बांधवांना या आध्यात्मिक अनुभवाचा लाभ मिळावा, हीच सर्वांची मनापासून इच्छा आहे.
----
मला डोळ्यांनी दिसत नसले, तरी इथल्या वातावरणाची दिव्यता मी मनाने अनुभवते आहे. श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यात आल्यावर हरिनामाचा गजर, भजन-कीर्तनांचे सूर आणि भक्तांच्या श्रद्धेची ऊर्जा माझ्या अंतरात्म्याला स्पर्श करून गेली. हा क्षण माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात सुंदर आणि अविस्मरणीय ठरणार आहे.
- सलोनी किशोर आंबेकर (वय २२), गोरेगाव
---
येथील वातावरण अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय आहे. इथे आल्यानंतर मनाला खूप शांतता मिळली. इतके छान वाटतेय, की इथून बाहेर पडावेसे वाटत नाहीये. मी घरी गेल्यावर पालकांना सांगणार आहे, की तुम्हीही या सोहळ्याला नक्कीच भेट द्यायला हवी.
- सुकिया कदम, इयत्ता आठवी, राजाराम शेठ विद्यालय, भांडुप
----
मी ग्राफिक डिझायनर असून पहिल्यांदाच येथे आलो आहे. इतकी अफाट गर्दी असूनही गुरुसेवकांनी अतिशय उत्तम नियोजन केले आहे. पिण्याचे पाणी, व्हीलचेअर आणि प्रसादाची सोय वाखाणण्याजोगी आहे. कुठेही गोंधळ नाही, सर्वांना सन्मानाने वागवण्यात आले.
- सुशांत धनवडे (वय ३४), दादर
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

Dharavi Crime: धक्कादायक! क्षुल्लक वाद टोकाला गेला अन् धारावीत रक्ताचा सडा पडला; मित्रानेच तरूणाला निघृणपणे संपवलं, काय घडलं?

Ranjangaon News : रांजणगाव एमआयडीसीत खंडणीसाठी दहशत; महिला व्यावसायिकेला धमकी, चालक व सुपरवायझरला मारहाण

MLAs Suspends: पक्षाविरोधी भूमिका नडली! BJD कडून सहा आमदारांचे तात्काळ निलंबन; टोकाचा निर्णय घेण्याचं नेमकं कारण काय?

Darvha Crime : सात वर्षीय चिमुकलीचा खून; शेजारच्या घरात पोत्यात सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT