मुंबई

दक्षिण भारतातील लालकेळी वनवासीत

CD

दक्षिण भारतातील लालकेळी वनवासीत
शेतकऱ्याच्या अभिनव प्रयोगाला यश
वाणगाव, ता. २२ (बातमीदार) : वातावरणातील बदलांमुळे रोगराई, तापमानवाढीने शेतीवर परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी नावीन्यपूर्ण प्रयोग करत आहे. जव्हार तालुक्यातील वनवासी गावात दक्षिण भारतातील जांभळ्या-लाल केळीची यशस्वी लागवड करण्यात आली आहे.
जव्हार तालुक्याच्या वनवासी गावात २५ वर्षांपूर्वी शेतीची समाधानकारक स्थिती नव्हती. गणपत गावंढा यांनी गावातील शेतकऱ्यांना शेतीचे ज्ञान देऊन मार्गदर्शन करून शेतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. आज वनवासी गावातील मोठ्या प्रमाणात शेतीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता अशा खडकाळ, डोंगराळ भागामध्ये दोन विहिरी खोदून पाण्याची समस्या मिटवली. तसेच बाजारामध्ये विशेष लागवड असलेल्या लाल केळीची लागवड केली आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या या केळीला बाजारात ७० पेक्षा अधिक भाव मिळत आहे. सध्या त्यांनी लागवड केलेली लाल केळींची वीस रोपे चांगले स्थितीमध्ये असून अपेक्षित उत्पादनही मिळत आहे.
---------------------------
आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक
- केळी खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. लाल सालीची केळी प्रामुख्याने दक्षिण भारतात म्हणजे केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, आग्नेय आशिया, दक्षिण अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर पिकवली जातात. या केळ्यांचे सेवनाने रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
- हृदय, त्वचा निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या आहारात लाल केळ्यांचे सेवन करावे. ही जास्त मऊ, गोड असतात. पिवळ्या केळीपेक्षा अधिक पौष्टिक मानली जाते. पिवळ्या, हिरव्या केळ्यांपेक्षा लाल केळी आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.
-------------------------------
शेतमालाचा दर्जा गुणवत्तापूर्ण असेल, तर कोणताही शेतमाल आपोआप बाजारात विकला जाऊ शकतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची तंत्रे अवगत करून विक्री, बाजारभाव, स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन शाश्वत उत्पादन देणाऱ्या पिकांकडे वळावे.
- गणपत गावंढा, शेतकरी, वनवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT