मुंबई

केंद्रीय विद्यालयात मराठीचा विसर

CD

केंद्रीय विद्यालयात मराठीचा विसर
मनसे आक्रमक, पालिकेकडून कडक कारवाईचा इशारा
ठाणे, ता. २२ : कोलशेत येथील केंद्रीय विद्यालयात मराठी विषय शिकवला जात नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठी विषयाची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा मनविसेने दिला होता, ज्याची दखल घेत ठाणे महापालिका शिक्षण विभागाने संबंधित शाळेला कडक निर्देश दिले आहेत. शासन निर्णयानुसार मराठी भाषा अनिवार्य करण्याचे आदेश पालिकेने बजावले आहेत.

महाराष्ट्रातील ७० केंद्रीय विद्यालयांमध्ये सुमारे ८१,६२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, कोलशेत येथील केंद्रीय विद्यालयात मराठी विषयासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही आणि हा विषय शिकवलाही जात नाही. मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये यासंदर्भात तक्रार केली होती. राज्याची राजभाषा आणि नुकताच ‘अभिजात’ दर्जा मिळालेली मराठी भाषा डावलली जात असल्याने विद्यार्थ्यांवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत केंद्रीय विद्यालय संघटनेच्या क्षेत्रीय कार्यालयाला लेखी पत्र धाडले आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार सर्व शाळांमध्ये मराठी ही दुसरी भाषा म्हणून शिकवणे बंधनकारक आहे. आगामी २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून कोणत्याही परिस्थितीत मराठीचे अध्यापन सुरू करावेच लागेल. तसेच सूचनांचे पालन न झाल्यास शाळेवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. यापूर्वी शालेय शिक्षणमंत्र्यांनीही मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचे संकेत दिले होते, त्या पार्श्वभूमीवर पालिकेचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

आंदोलनाचा इशारा
केंद्रीय विद्यालय कोलशेत येथे मराठी विषय न शिकवणे हा थेट नियमभंग आहे. केंद्र सरकारने मराठीला ‘अभिजात’ दर्जा दिला असताना, केंद्रीय विद्यालये मात्र मराठीचा अपमान करत आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात मराठी विषय सुरू न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT