मुंबई

कोट्यवधींचा पाडकाम खर्च, पण मलबा कुठे?

CD

उल्हासनगर पालिकेत मलबा घोटाळा?
पाडकामासाठी कोट्यवधींचा खर्च; मात्र मलबा गायब, नगरसेवकांचा प्रशासनाला सवाल
उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : शहरातील धोकादायक इमारतींच्या पाडकामावरून उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. पाडकामासाठी खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांचा हिशोब आणि त्यातून निघालेला मलब्याचे गौडबंगाल नेमके काय, असा थेट सवाल उपस्थित करत भाजप नगरसेवक राजेश वानखेडे यांनी प्रशासनाला धारेवर धरले. या मुद्द्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला असून, ‘मलबा घोटाळ्या’ची चर्चा आता शहरात रंगू लागली आहे.

उल्हासनगरमध्ये गेल्या काही वर्षांत इमारती कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने अनेक अतिधोकादायक इमारतींवर पाडकामाची कारवाई केली. मात्र, या पाडकामासाठी पालिकेच्या तिजोरीतून नेमका किती निधी खर्च झाला आणि पाडकामानंतर निघालेल्या टनांवारी मलब्याची विल्हेवाट कुठे लावली, याची कोणतीही स्पष्ट आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे.

महासभेत नगरसेवक राजेश वानखेडे यांनी आक्रमक पवित्रा घेत विचारले की, ‘‘जर पाडकामासाठी कोट्यवधी रुपये खर्च होत असतील, तर त्यातून निघणाऱ्या लोखंडी सळ्या आणि मलब्यातून पालिकेला उत्पन्न का मिळाले नाही? हा राडारोडा गेला कुठे?’’ या प्रश्नांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली. या गंभीर आरोपांनंतर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी हस्तक्षेप करत, या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संपूर्ण लेखी अहवाल लवकरच सभागृहासमोर सादर करण्याचे आश्वासन दिले आहे.

पारदर्शकतेचा अभाव
पाडकाम कंत्राटांमध्ये मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे. पाडकामासाठी राडारोडा अधिकृत डम्पिंग ग्राउंडवर गेला की खासगी ठिकाणी विकला गेला, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच पाडकामासाठी झालेला खर्च आणि प्रत्यक्षात झालेली कारवाई यांचा ताळमेळ लागत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. याबाबत भाजप नगरसेवक राजेश वानखेडे यांनी म्हटले की, धोकादायक इमारती पाडण्याच्या नावाखाली पालिकेच्या पैशांची उधळपट्टी सुरू आहे. मलब्याची विल्हेवाट लावताना कोणतेही नियम पाळले जात नाहीत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हायला हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

Ayurvedic Tips for Oral Health: आयुर्वेदात सांगितलेल्या या सवयी फक्त दाताचं आरोग्यच नाही, तर पचनही परफेक्ट करतात; आजच फॉलो करा

Satara ZP: कायद्याचे रक्षक की सत्तेचे साधक! सातारा झेडपी अध्‍यक्ष निवडीवेळी झालेल्‍या ‘पाॅवर प्‍ले’चे पडसाद; पोलिसांच्या भूमिकेवर संशय..

SCROLL FOR NEXT