मुंबई

डहाणू बस आगाराची झाडाझडती

CD

डहाणू बस आगाराची झाडाझडती
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी
कासा, ता. २२ (बातमीदार)ः डहाणू येथील बस आगाराला भेट देऊन प्रवासी सेवांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या वेळी आगारातील शौचालये, स्वच्छतागृह, पाणपोईंची प्रत्यक्ष पाहणी करत विविध सुविधा, व्यवस्थापनाची स्थिती तपासण्यात आली.
पाहणीदरम्यान उपस्थित प्रवाशांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. अनेक प्रवाशांनी स्वच्छतेच्या अभावाबाबत नाराजी व्यक्त केली. विशेषतः शौचालयातील अस्वच्छता निदर्शनास आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्याचे आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय आगारातील इतर त्रुटींचाही आढावा घेत दूर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यावरही भर देण्यात आला. एसटी महामंडळाच्या माध्यमातून प्रवाशांना मूलभूत व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक असून, खपवून घेणार नाही, असा इशारा देण्यात आला.
-------------------------
कर्मचाऱ्यांशी संवाद
मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणीदरम्यान आगारातील कर्मचाऱ्यांशीही संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. कर्मचारी, प्रवासी यांच्या समस्या सोडवून सेवा अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT