खारघर, ता. २२ (बातमीदार) : सेक्टर २३ परिसरातील बाउंसिंग बनी कॅफेमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. कॅफेमधील व्हिडिओ गेम्स, वातानुकूलित यंत्रणा आणि आतील सजावटीचा मोठा भाग खाक झाला आहे. ही घटना शनिवारी (ता. २१) सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
खारघरमधील सेंट्रल पार्कलगत असलेल्या बाउंसिंग बनी नावाचे कॅफे आणि रेस्टॉरंट आहे. या कॅफेत व्हिडिओ गेमसह रेस्टॉरंट असल्यामुळे नागरिक, तसेच गेम खेळणाऱ्या तरुणाईची गर्दी असते. अग्निशमन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कॅफे सुरू असताना अचानक धूर येऊ लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. काही क्षणातच आगीने रुद्र रूप धारण केले. कॅफेमध्ये मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे असल्यामुळे आग वेगाने पसरली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन जवानांनी तत्परतेने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि काही वेळातच आग नियंत्रणात आणली; मात्र तोपर्यंत कॅफेमधील व्हिडिओ गेम मशीन, एसी यंत्रणा, वायरिंग आणि फर्निचरचे नुकसान झाले होते. प्राथमिक तपासानुसार, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.