मुंबई

कृषि विज्ञान केंद्रात रमले माजी प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थी संमेलन

CD

शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पहा ः राजेश ठोकळ
रोहा कृषी विज्ञान केंद्रात माजी प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थ्यांचा मेळावा
रोहा, ता. २२ (बातमीदार) ः शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहा, शेतीही नक्कीच फायद्याची आहे. काळानुसार नैसर्गिक सेंद्रिय शेती करून जास्तीत जास्त उच्चप्रतीचे उत्पादन घ्या, असे आवाहन विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ यांनी केले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र येथे माजी प्रशिक्षणार्थी आणि विद्यार्थी संमेलन या उपक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेश ठोकळ यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा उत्साहात पार पडला. केंद्राचे प्रमुख डॉ. मनोज तलाठी, शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य राजेश कोळवणकर आणि सदस्या स्वाती मालुसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे संमेलन भरविण्यात आले होते. डॉ. प्रमोद मांडवकर यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. त्यानंतर केंद्राचे प्रमुख मनोज तलाठी यांनी उपस्थित युवा उद्योजकांना कृषी विज्ञान केंद्रामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल आणि यापुढे यशस्वी उदयोजक म्हणूनच नावारूपाला या, असे आवाहन करून सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ठोकळ यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या या उपक्रमाबाबत तलाठी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. शेतकरी उत्पादक कंपनी, गटशेती, एकात्मिक शेती, आधुनिक सिंचन प्रणाली, आच्छादन सारख्या संकल्पनांचा आणि विद्यापीठ विकसीत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहनही ठोकळ यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmers Protest: कोकणातील शेतकरी मुंबईत आक्रमक! बडे नेते आणि आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु; काय आहे मागणी?

Election Fraud: मतदानानंतर उघड झाला मोठा खेळ! ‘या’ राज्याच्या निवडणुकीत अवैध मतदान; १० विदेशी नागरिकांसह चार महिला अटकेत

High Court : ती मशीद नाही तर देवी सरस्वतीला समर्पित मंदिर ; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निकाल

हार्दिक श्रेयस विसरा! रवी शास्त्रींनी टीम इंडियाच्या कॅप्टन्सीसाठी सुचवलं 'हे' नाव म्हणाला मला...

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT