Farmers Protest: कोकणातील शेतकरी मुंबईत आक्रमक! बडे नेते आणि आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरु; काय आहे मागणी?

Mumbai Mango Farmers Protest: आंबा आणि काजू उत्पादकांचा मुंबईत मोर्चा सुरू आहे. पोलिसांनी विनायक राऊत महादेव जानकर आणि आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.
Mumbai Mango Farmers Protest

Mumbai Mango Farmers Protest

ESakal

Updated on

आंब्याच्या फुलोऱ्याच्या काळात झालेला अवकाळी पाऊस, तापमानातील चढउतार, फळमाशीचा प्रादुर्भाव, टोळधाड, बुरशीजन्य रोग आणि कीटकनाशकांच्या वाढत्या किमतींमुळे कोकण भागातील आंबा आणि काजू उत्पादकांना यंदा मोठा फटका बसला आहे. बदलत्या हवामानामुळे देवगडसह अनेक भागांमध्ये आंब्याच्या उत्पादनात ९० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने निदर्शने करूनही सरकारच्या निष्क्रियतेच्या विरोधात कोकणातील आंबा उत्पादकांनी आंदोलन पुकारलं आहे. ते आता चिघळल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com