‘गीतरामायण’ अनुभवण्याची विरारकरांना संधी
सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम
विरार, ता. २२ (बातमीदार) : ग. दि. माडगुळकर यांच्या शब्दांतून, सुधीर फडके (बाबूजी) यांच्या स्वरांनी साकारलेले अजरामर ‘गीतरामायण’ अनुभवण्याची सुवर्णसंधी विरारकर रसिकांना मिळणार आहे. सुधीर फडके भावतरंग अंतर्गत हा भक्तिमय सोहळा गुरुवारी (ता. २६) संध्याकाळी ६ वाजता विरार (पश्चिम) येथील जुन्या विवा कॉलेजसमोर असलेल्या मंगलमूर्ती मंदिरात होणार आहे.
या कार्यक्रमात मुख्य सादरीकरण गायक उदयकुमार उपाध्ये करणार आहेत. स्नेहल चौधरी, शिल्पा पाटील, पल्लवी वर्तक, प्रणीती पाटील, रूपाली चौधरी आणि माधुरी वर्तक सहगायक म्हणून साथ देणार आहेत. तर संवादिनीवर महेश घाटे, तबल्यावर वैभव वसईकर, तालवाद्यावर धीरेन, गीत धुरू आपली कला सादर करतील. प्रभू श्रीरामांचा जीवनप्रवास गीतांच्या माध्यमातून उलगडणारा हा स्वरसोहळा रसिकांसाठी पर्वणी ठरणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.