मुंबई

२७ गावांमध्ये चर्चा तर होणारच

CD

२७ गावांत क्लस्टर योजनेविरोधात ‘एल्गार’
संघर्ष समितीचा ‘चर्चा तर होणारच’चा नारा
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांवर लादल्या जाणाऱ्या क्लस्टर योजनेविरोधात भूमिपुत्रांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती’च्या वतीने या योजनेविरोधात प्रत्येक गावात जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ‘चर्चा तर होणारच’ या विशेष मोहिमेचा प्रारंभ सोनारपाडा येथील साईबाबा मंदिरातून करण्यात आला.

सोनारपाडा येथे आयोजित सभेत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी क्लस्टर योजनेचे दुष्परिणाम नागरिकांसमोर मांडले. मुळात झोपडपट्टी पुनर्विकासासाठी असलेली ही योजना सरसकट गावांवर लादून भूमिपुत्रांच्या जमिनी बळकावण्याचा हा प्रशासकीय डाव असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जोपर्यंत २७ गावांची स्वतंत्र महापालिका होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा ठाम निर्धार सत्यवान म्हात्रे यांनी व्यक्त केला.

काही स्तरांतून २७ गावांत क्लस्टर योजना नसल्याच्या अफवा पसरवल्या जात होत्या. या अफवांना छेद देण्यासाठी संघर्ष समितीने सभेत प्रत्यक्ष शासन परिपत्रक आणि नकाशांचे वाटप केले. आम्ही पुराव्यानिशी जनतेसमोर जात आहोत, आता अफवा पसरवणाऱ्यांना जनताच धडा शिकवेल, असे समितीचे सुमीत वझे यांनी नमूद केले. या सभेला सत्यवान म्हात्रे, सुमीत वझे, रतन पाटील, रामचंद्र पाटील, मधुकर माळी, शिवाजी माळी, संदीप पालकरी, राहुल जाधव, विठ्ठल वायले, तुळशीराम पाटील, हरिश्चंद्र राणे, तकदीर काळन, नगरसेवक महेश पाटील, जालिंदर पाटील, कैलास जोशी, निलेश खांबायत, माजी नगरसेवक गणेश भाने, संदीप माळी, संतोष केणे यांसह अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

उग्र आंदोलनाचा इशारा
संघर्ष समितीचे अध्यक्ष खासदार सुरेश म्हात्रे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जर ही जाचक क्लस्टर योजना रद्द केली नाही, तर आगामी काळात उग्र आंदोलन छेडले जाईल. भाजप नगरसेवक महेश पाटील यांनीही या लढ्याला पाठिंबा देत गरज पडल्यास कायदेशीर लढाईसह रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची तयारी दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सोशल मीडियाचा निष्पक्ष न्यायप्रक्रियेला धोका; सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण; व्यक्त केली गंभीर चिंता, काय म्हणाले?

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Pune Crime: चाेरट्यांचा तब्बल २८ तोळे सोन्यावर डल्ला; आंबेगाव तालुक्यातील घटना, घरात काेणी नसल्याने साधला डाव!

Ayurvedic Tips for Oral Health: आयुर्वेदात सांगितलेल्या या सवयी फक्त दाताचं आरोग्यच नाही, तर पचनही परफेक्ट करतात; आजच फॉलो करा

Satara ZP: कायद्याचे रक्षक की सत्तेचे साधक! सातारा झेडपी अध्‍यक्ष निवडीवेळी झालेल्‍या ‘पाॅवर प्‍ले’चे पडसाद; पोलिसांच्या भूमिकेवर संशय..

SCROLL FOR NEXT