मुंबई

नवी मुंबईतील अविनाश शिंदेचा ‘मुंबई श्री’त झंझावात

CD

नवी मुंबईतील अविनाश शिंदेचा ‘मुंबई श्री’त झंझावात
रौप्य पदक पटकावत घडवली यशोगाथा
तुर्भे, ता २२ (बातमीदार ) : शरीरसौष्ठव क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘मुंबई श्री’ स्पर्धेत अविनाश शिंदे याने उल्लेखनीय कामगिरी करत रौप्य पदक पटकावले असून दुसरा क्रमांक मिळवला आहे. त्याच्या या यशामुळे परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नवी मुंबईतील तुर्भे येथील रहिवाशी असलेला अविनाश शिंदेचा हा विजय केवळ एका स्पर्धेपुरता मर्यादित नसून, त्यामागे अनेक वर्षांचे कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आहेत. स्वतःचा व्यवसाय सांभाळत आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडत त्याने फिटनेस क्षेत्रात आपली वाटचाल सुरू ठेवली. वेळेच्या मर्यादा आणि विविध अडचणींवर मात करत त्याने शरीरसौष्ठवाची साधना अखंडितपणे केली.
‘मुंबई श्री’च्या रंगमंचावर त्याचे सादरीकरण प्रभावी ठरले. त्याच्या शरीरयष्टीतून केवळ मेहनतीच नव्हे, तर आत्मविश्वास आणि चिकाटीचेही दर्शन घडले. परीक्षकांची मने जिंकत त्याने स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला.अविनाशच्या या यशामुळे त्याच्या कुटुंबासह संपूर्ण परिसरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संघर्षातून यश संपादन करणारा अविनाश शिंदे आज अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

Shabbir Ahmed Ansari Passes Away: ओबीसी नेते शब्बीर अहमद अन्सारी यांचे निधन; मंत्री छगन भुजबळांसह ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेकडून शोक व्यक्त!

Solapur Textile Industry: सोलापूरच्या कापड उद्योगास ५०० कोटींचा फटका; कच्चा माल महागला अन् निर्यात विस्कळित; हजार डॉलरचे शिपमेंट ५ हजारांवर!

Latest Marathi News Live Update : भिवंडीतील कोनगाव येथे भंगार गोदामाला भीषण आग; दोन गोदाम जळून खाक

SCROLL FOR NEXT