मुंबई

५९ माध्यमिक शाळांना ''सौर'' आधार

CD

५९ माध्यमिक शाळांना ‘सौर’ आधार
ग्रामीण भागात सोलर पॅनेलचे वाटप
टोकावडे ता. २२ (बातमीदार) : ग्रामीण भागातील वीजटंचाईवर मात करत डिजिटल शिक्षणाला गती देण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मोठे पाऊल उचलले आहे. आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून मुरबाड, शहापूर आणि बदलापूर ग्रामीण भागातील एकूण ५९ माध्यमिक शाळांना सोलर पॅनेलचे वाटप करण्यात आले. मुरबाड तालुक्यातील शिवळे येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला.

ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने संगणक शिक्षण आणि इतर तांत्रिक सुविधांमध्ये अडथळे येत होते. ही समस्या लक्षात घेऊन आमदार म्हात्रे यांनी शाळांची पाहणी करून त्यांच्या गरजेनुसार सौरऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे आता ग्रामीण विद्यार्थ्यांना अखंडित वीजपुरवठा मिळून त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडणार आहे. सौरऊर्जेमुळे शाळांचे वीजबिल वाचणार असून, वीज गेल्यावरही डिजिटल वर्ग सुरू राहतील. हा उपक्रम ग्रामीण भागातील शिक्षणाचा चेहरामोहरा बदलणारा ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला माजी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील, माजी आमदार गोटीराम पवार, ठाणे जिल्हा ग्रामीण भाजप अध्यक्ष जितेंद्र डाकी आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष गणेश पाटील, सचिव प्रवीण लोंढे यांच्यासह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तालुकानिहाय शाळांची संख्या
मुरबाड : २६ माध्यमिक शाळा
बदलापूर ग्रामीण : २० माध्यमिक शाळा
शहापूर : १३ माध्यमिक शाळा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्याच्या घामाची थट्टा! २-३ लाख खर्चून पिकलेला १२ क्विंटल कांदा नेला बाजार समितीत, विक्रीनंतर खिशातला रुपया देण्याची वेळ

LSG vs RCB Live: १८ चेंडूंत ९० धावा! मिचेल मार्शच्या शतकाने गाजवला सामना; निकोलस पूरन अन् कृणाल पांड्या यांच्यात भांडण Video

LSG vs RCB Live: ९ चौकार, ८ षटकार! मिचेल मार्शचे वादळी शतक, बंगळुरूची धुलाई

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोरेगावच्या जंगलात भीषण आग

Matheran Traffic Issue : माथेरानला जाताय? आता पार्किंगचं टेन्शन मिटलं! दस्तुरी नाक्यावर पर्यटकांसाठी 'ही' खास सोय, पहा काय आहे नवा प्लॅन

SCROLL FOR NEXT