दिवाळेत जीवघेण्या वीजवाहिन्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
तुर्भे, ता २२ (बातमीदार) : दिवाळे कोळीवाड्यातील डॉक्टर गल्ली आणि परिसरात वीजवाहिन्यांचा अक्षरशः ‘जंजाळ’ निर्माण झाला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित ठिकाणी विद्युत खांबाभोवती असंख्य तारा अनियमितपणे गुंडाळलेल्या अवस्थेत दिसत असून, ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे स्पष्टपणे दिसतं आहे.
या वेळी सभोवतालच्या वीज खांबांवर आणि त्याच्या आसपाच्या घरांजवळ विविध प्रकारच्या वायर कोणत्याही नियोजनाशिवाय एकमेकांत गुंतलेल्या असून, काही वायर खाली लोंबत आहेत तर, काही उघड्या अवस्थेत असल्याने कोणत्याही क्षणी शॉर्टसर्किट होण्याची दाट शक्यता आहे. तसेच खांबाजवळच इतर उपकरणे उघड्यावर असल्याने आग लागण्याचा धोका अधिक आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या परिसरात यापूर्वीही शॉक लागण्याच्या तसेच किरकोळ आगीच्या घटना घडल्या आहेत. मात्र, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. तरीदेखील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, हा परिसर दाट वस्तीचा असून, लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांची सतत वर्दळ असते. अशा परिस्थितीत या उघड्या आणि गुंतागुंतीच्या वायर कोणत्याही क्षणी जीवघेण्या ठरू शकतात.
दरम्यान, पावसाळ्यात ही समस्या अधिकच गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात असून, नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.