महावितरणच्या खोदकामानंतर रस्त्यांचे डांबरीकरण करा
युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस निखिल मांडवे यांचे लेखी निवेदन, नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित
नेरूळ, ता. २२ (बातमीदार)ः नेरूळ सेक्टर सहा, आठ परिसरात एम.एस.ई.डी.सी.एल.सीने विद्युत केबल्स टाकण्यासाठी रस्त्यावर पदपथालगत खोदकाम केलेल्या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्याची मागणी युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस निखिल मांडवे यांनी महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात एम.एस.ई.डी.सी.एल.सीने विद्युत केबल्स टाकण्यासाठी नेरूळ सेक्टर सहा व आठ परिसरातील रस्त्यावर पदपथालगत खोदकाम केलेले आहे. खोदकाम करून महिना लोटला या ठिकाणी पालिका प्रशासनाकडून अद्यापही खोदकामाच्या ठिकाणी डांबरीकरण करण्यात आलेले नाही.
या खोदकामामुळे परिसर बकाल दिसत आहे. अनेक गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेशद्वारावरच हे खोदकाम केले असल्यामुळे रहादारीच्या रस्त्यांवरून जाताना समस्या निर्माण होत आहेत. समस्येचे गांभीर्य व स्थानिक रहिवाशांना होत असलेला त्रास पाहता संबंधितांना नेरूळ सेक्टर सहा व आठमधील महावितरणने खोदकाम केलेल्या ठिकाणी तातडीने डांबरीकरण करण्याचे निर्देश देण्याची मागणी निखिल मांडवे यांनी महापालिका विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.