मुंबई

गॅस जोडणीच्या नावाखाली दीड लाखांची फसवणूक

CD

नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : घरी बसून गॅस कनेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ५७ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्याने एक लाख ५२ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार नेरूळमध्ये उघडकीस आला आहे. सायबर चोरट्याने महानगर गॅस लिमिटेडचा अधिकारी असल्याचे भासवून या व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे लंपास केले आहेत.

ब्रिजेश सुरेंद्र सिंग (वय ५७) हे नेरूळ सेक्टर १९ मधील एअर इंडिया कॉलनी परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्याकडे गॅस कनेक्शन नसल्याने त्यांनी नवीन गॅस कनेक्शन घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. व्हॉट्सॲप मेसेजद्वारे गॅस कनेक्शनसंदर्भात सिंग यांना मोबाईल नंबर मिळाल्याने त्यांनी बुधवारी (ता. १८) त्या क्रमांकावर संपर्क साधला होता. त्या वेळी स्वतःला महानगर गॅस लिमिटेडचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्या सायबर चोरटा विवेक गुप्ता याने नवीन गॅस कनेक्शनसाठी नोंदणी करण्याच्या बहाण्याने त्यांना एक फाइल पाठवली. तसेच त्या फाइलमध्ये आपली वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले.

सिंग यांनी विश्वासाने ती फाइल उघडून त्यात माहिती भरली. मात्र, ती फाइल प्रत्यक्षात एक बनावट मालवेअर सॉफ्टवेअर असल्याने सायबर चोरट्याने त्याचा वापर करून सिंग यांच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या खात्याचा ताबा मिळवला. त्यानंतर त्यांच्या खात्यातून एकूण एक लाख ५२ हजार रुपये परस्पर वळवून घेतले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे सिंग यांच्या लक्षात आले. त्यानंतर ब्रिजेश सिंग यांनी नेरूळ पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

आनंदाची बातमी! नागरिकांना घरबसल्या मिळणार दस्ताची प्रमाणित प्रत; राज्यभर राबवण्यात येणार, नेमकी काय आहे सुविधा?

Mumbai Crime: मुंबईत रागातून २ अल्पवयीन मुलांनी मित्राला संपवलं, नंतर हातपाय धुवून मृतदेहाशेजारीच झोपले अन्...; कारण काय?

SCROLL FOR NEXT