मुंबई

हवा गुणवत्ता सुधारण्यासाठी रणनीती

CD

तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबई शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेकडून सर्वसमावेशक ‘वायू गुणवत्ता सुधारणा कार्यक्रम’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील हवेची गुणवत्ता उंचावण्यावर विशेष भर दिला जाणार असून, प्रदूषणाची कारणे ओळखून त्यावर वैज्ञानिक पद्धतीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर साचणारी धूळ, बांधकाम व उत्खननाच्या ठिकाणी निर्माण होणारे सूक्ष्म कण तसेच वाहनांची वाढती संख्या यामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. याशिवाय औद्योगिक व रासायनिक प्रक्रियांमधून होणारे वायू उत्सर्जनही प्रदूषणात भर घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेषतः औद्योगिक क्षेत्रांमुळे निर्माण होणाऱ्या रासायनिक वायूंवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचेही अधोरेखित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून शहरातील रस्त्यांची नियमित स्वच्छता, धूळ नियंत्रणासाठी पाणी फवारणी तसेच बांधकाम स्थळांवर कडक नियम लागू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित ठिकाणी आवश्यक उपाययोजना सक्तीने राबविण्यात येणार आहेत. महापालिकेच्या महासभेत गटनेते सागर नाईक यांनी मांडलेला हा प्रस्ताव लवकरच मंजुरीसाठी सादर होणार असून, शहरातील प्रदूषणाच्या समस्येवर दीर्घकालीन तोडगा काढण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहराच्या प्रवेशद्वारांवर विशेष यंत्रणा
शेजारील शहरांतून येणारे प्रदूषण रोखण्यासाठी शहराच्या प्रवेशद्वारांवर विशेष यंत्रणा उभारण्याचा विचार आहे. औद्योगिक क्षेत्रांमधील कंपन्यांवरही नियंत्रण ठेवत त्यांच्याकडून होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.

प्रस्तावित उपाययोजना
- शहरातील रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता आणि नियमित पाणी फवारणी
- रस्त्यांवरील झाडे व धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा
- बांधकाम व उत्खनन स्थळांवर धूळ नियंत्रणासाठी सक्तीचे नियम
- एमआयडीसी परिसरातील उद्योगांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कडक उपाय
- प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी शहराच्या वेशीवर ‘एअर बलून’ प्रणाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT