मुंबई

तळोज्यामध्ये अतिक्रमणविरोधात सिडकोची धडक कारवाई

CD

तळोज्यामध्ये अतिक्रमणविरोधात सिडकोची धडक कारवाई
खारघर, ता. २१ (बातमीदार) : तळोजा नोड परिसरात सिडकोने धडक मोहिम राबवून अनधिकृत बांधकामांवर नुकतीच मोठी कारवाई केली. या कारवाईत सेक्टर ४० परिसरातील रस्ते आणि मोकळ्या भूखंडांवर उभारलेली व्यावसायिक अतिक्रमणे हटविण्यात आली.
सिडकोच्या अधिसूचित जागेवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता दुकाने, चाळ, ट्रक पार्किंग तसेच झोपड्या आदी बांधकामे नियमबाह्य उभारण्यात आले होते. त्यामुळे सिडकोच्या प्रचलित नियमावली व धोरणांचा भंग केल्याप्रकरणी ही सर्व अतिक्रमणे निष्कासित करण्यात आली. ही कारवाई मुख्य दक्षता अधिकारी यांच्या निर्देशानुसार आणि मुख्य नियंत्रक, अनधिकृत बांधकामे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या वेळी सिडको अतिक्रमण विभाग, स्थानिक पोलीस, सिडको पोलीस पथक, महावितरण अधिकारी, सिडको सुरक्षा रक्षक व महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे कर्मचारी यांच्या संयुक्त सहभागातून कारवाई करण्यात आली.
या मोहिमेसाठी २ जेसीबी, १ ट्रक, ४ जीप, १ टेम्पो ट्रॅव्हलर व १० कामगारांचा वापर करण्यात आला. पोलीस बंदोबस्तात शांततेत ही कारवाई पूर्ण करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (ता.१७) करण्यात आली. सिडकोच्या जागांवरील अतिक्रमणांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक पावले उचलली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : एलपीजी दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या महाग झाले की स्वस्त?

Akola: धान्याची पोती उचलणाऱ्यांच्या घरातच उपासमारी; ११० माथाडी कामगारांची मजुरी रखडली; कुटुंबीयांवर आर्थिक संकट

Maharashtra:तळकोकणात आनंदसरी;मॉन्सूनचे सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत आगमन

New Marathi releases : खेडूत ते क्रिकेटर, टेक-३, राजूभाई बीएएमएस आणि सिंधी; प्रेरणादायी प्रवासकथांच्या नव्या मराठी पुस्तकांची ओळख

French Open Women's Champion: 19 वर्षीय मीराचा इतिहास! फ्रेंच ओपन जिंकत केला असा पराक्रम, जो अनेक दिग्गजांनाही जमला नाही

SCROLL FOR NEXT