मराठी माध्यमाच्या शाळांकडे दुर्लक्ष; मनसेचा आरोप
पालिका प्रशासन धोरणावर टीका
जुईनगर, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सीबीएसई बोर्डाचा वाढता प्रभाव आणि त्याचवेळी मराठी माध्यमाच्या शाळांकडे होत असलेले दुर्लक्ष हा मुद्दा महासभेत चांगलाच गाजला. मनसेचे नगरसेवक अभिजित देसाई यांनी प्रशासनाच्या धोरणांवर टीका करत मराठी शाळांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले.
महापालिकेकडून शहरात जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या नावाखाली सीबीएसई बोर्डाला प्राधान्य दिले जात आहे. मात्र, याचवेळी मराठी माध्यमाच्या शाळांकडे दुर्लक्ष होत असून, त्यांच्या मूलभूत सुविधांकडेही पुरेसे लक्ष दिले जात नाही. अनेक शाळांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता, शिक्षकांची अपुरी संख्या आणि विद्यार्थ्यांची घटती उपस्थिती ही गंभीर समस्या असल्याचे देसाई यांनी निदर्शनास आणून दिले.
“शहरात आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण देणे आवश्यक आहे, याबाबत आमचा विरोध नाही. मात्र, हे करताना मराठी माध्यमाच्या शाळांना डावलले जाऊ नये. मराठी शाळा टिकल्या तरच मराठी भाषा आणि संस्कृती टिकेल,” असा इशारा देसाई यांनी दिला.
तसेच, मराठी शाळांच्या उन्नतीसाठी ठोस धोरण आखावे, पायाभूत सुविधा सुधाराव्यात, तसेच विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष उपक्रम राबवावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
या मुद्द्यावर आता पालिका प्रशासन काय भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मराठी माध्यमाच्या शाळांचा समतोल विकास साधण्याची गरज या मुद्यातून अधोरेखित करण्यात आली. मराठी शाळांचे अस्तित्व आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी पुढील काळात कोणती पावले पालिका प्रशासनाकडून उचलली जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.