मुंबई

उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना जनगणनेची जबाबदारी

CD

उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना जनगणनेची जबाबदारी
शहापूर (वार्ताहर) : यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शिक्षकांना जनगणनेचे काम सोपविण्यात येणार असल्याने सुट्टीवर मर्यादा येणार आहेत. २ मे ते १४ जून या कालावधीत शिक्षकांना नियमित सुट्टी मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या उपक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद; तसेच खासगी अनुदानित शाळांमधील साडेपाच हजार शिक्षकांची नेमणूक करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षकांचा समावेश असणार आहे. १ मे रोजी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर २ मेपासून शाळांना अधिकृत उन्हाळी सुट्टी लागणार आहे. मात्र, १६ मे ते १४ जून या कालावधीत शिक्षकांना जनगणनेअंतर्गत विविध याद्या तयार करण्याचे काम दिले जाणार आहे. दरम्यान, या कालावधीत संबंधित शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीतही शिक्षकांना शासकीय कामात गुंतवले जाणार असल्याने शिक्षकवर्गात नाराजी व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale: राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बरोबरच: मंत्री भरत गोगावले; माढा तालुक्यातील फळबागांची केली पाहणी!

Dilip Walse Patil: आंबेगाव तालुक्यातील ५ हजार ५८१ खाती कर्जमाफीसाठी पोर्टलवर अपलोड: दिलीप वळसे पाटील; उर्वरित खाती तातडीने अपलोड करा!

FDA Supplement Alert: खळबळजनक! Amazon वरून खरेदी केलेल्या गोळ्यांमध्ये आढळलं विष; वापर थांबवण्याचं आवाहन

रोहित शर्माने पूर्ण केलं संजू राठोडचं स्वप्न, 'हिटमॅन'सोबतचा व्हिडिओ शेअर करत म्हणाला...'लहानपणीचं स्वप्न...' Viral Video

Akola News : अकोल्यात 'ऑपरेशन टायगर' फत्ते; पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे- माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया

SCROLL FOR NEXT