मुंबई

विरारमध्ये इमारतीच्या आठव्या मजल्यावर आग

CD

विरारमध्ये इमारतीच्या आठव्या मजल्यावर आग
धुरामुळे रहिवासी अडकले; ११ जणांची सुटका

नालासोपारा, ता. २२ (बातमीदार) : विरार पूर्व येथे एका इमारतीच्या आठव्या मजल्यावर रविवारी सकाळी आग लागली. यात धुरामुळे ११ रहिवासी घरात अडकले होते. अग्निशमन दलाने तत्पर कारवाई करीत सर्वांची सुखरूप सुटका केली.

विरार पूर्व येथील शारदा हाईट्स या इमारतीच्या आठव्या मजल्यावर रविवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत अडकलेल्या ११ रहिवाशांना वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाने यशस्वीरीत्या सुखरूप बाहेर काढले. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आठव्या मजल्यावरील तीन फ्लॅटच्या मुख्य दरवाजांच्या पॅनेलला आग लागली. मुख्य दरवाजाजवळ आग भडकली आणि मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने रहिवाशांना घराबाहेर पडणे कठीण झाले. काही रहिवासी बाहेर पडण्यात यशस्वी झाले, मात्र ११ जण घरातच अडकून पडले होते.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नगरसेवक प्रशांत राऊत यांनी तत्काळ अग्निशमन दलाशी संपर्क साधला. फुलपाडा उपकेंद्रातून अग्निशमन दलाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी विजय राणे यांच्या नेतृत्वाखाली जवानांनी तत्परतेने बचावकार्य हाती घेतले. या पथकाने अडकलेल्या रहिवाशांचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित बाहेर काढले. बचाव करण्यात आलेल्यांमध्ये लहान मुले, ज्येष्ठ महिला आणि पुरुष यांचा समावेश होता. त्यानंतर अग्निशमन दलाने आग पूर्णपणे नियंत्रणात आणली.

आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र संबंधित घरांच्या दरवाजांचे मोठे नुकसान झाले आहे. विरार पूर्वेतील नाना-नानी पार्क परिसरात दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली ही १२ मजली शारदा हाईट्स इमारत असून, आठव्या मजल्यावरील ८०५, ८०६ आणि ८०७ क्रमांकाच्या घरांच्या दरवाजांना आग लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs CSK: 'चेन्नई सुपर किंग्स नाही, तर मुंबई इंडियन्सच IPL मधील सर्वोत्तम संघ,कारण...' इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं

Pune Crime: जुन्नर शहरात पहाटेच्या वेळी महिला चोरांच्या टोळीचा थरार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, नेमकं काय घडलं!

‘नाव लिहिलंय, आता तुझी पाळी’; ‘तांत्रिक डायरी’ बनली अत्याचाराचे शस्त्र, महिलेला १५ वर्षे छळलं, खरातनंतर ‘बडे बाबा’चा भंडाफोड

Gas supply: महाराष्ट्रात LPG कोट्यात 20% वाढ! छगन भुजबलांची मोठी घोषणा; मात्र एक अटही लागू होणार, कोणती अन् कधीपासून?

Ahilyanagar Gas Shortage: एक लाख ग्राहक गॅसच्या प्रतीक्षेत; अहिल्यानगर जिल्ह्यात दररोज २५ हजार सिलिंडरचे वाटप, हाॅटेल, रेस्टॉरंट उद्योगांना मर्यादा!

SCROLL FOR NEXT