मुंबई

डहाणू फेस्टिवलला उदंड प्रतिसाद

CD

डहाणू फेस्टिव्हलला उत्स्फूर्त प्रतिसाद
शेवटच्या दिवशी अलोट गर्दी; सांस्कृतिक कार्यक्रम आणि खाद्यपदार्थांची रेलचेल

पालघर/डहाणू, ता. २२ : डहाणू फेस्टिव्हलला यंदा नागरिक आणि पर्यटकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्यपदार्थ स्टॉल्स आणि वॉटर स्पोर्ट्समुळे समुद्रकिनारा ‘हाउसफुल’ झाला. शेवटच्या दिवशी मोठी गर्दी उसळली असून, स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली.

पर्यटन, संस्कृती आणि स्थानिक कलेचा सुंदर संगम ठरलेल्या डहाणू फेस्टिव्हलला यंदा नागरिक आणि पर्यटकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. फेस्टिव्हल पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने डहाणूच्या समुद्रकिनारी अक्षरशः ‘हाउसफुल’चे चित्र पाहायला मिळाले.

फेस्टिव्हलच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला सादरीकरणे, संगीत मैफली आणि आधुनिक मनोरंजनाची साधने पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरली. स्थानिक वारली कला, पारंपरिक नृत्यप्रकार आणि खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.

समुद्रकिनाऱ्यावर उभारण्यात आलेल्या आकर्षक सजावटी, लाइटिंग आणि सेल्फी पॉइंट्समुळे तरुणांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. मुलांसाठी खेळणी, अ‍ॅडव्हेंचर गेम्स आणि विविध मनोरंजनाचे उपक्रम उपलब्ध करून देण्यात आल्याने कुटुंबांसह आलेल्या पर्यटकांनी फेस्टिव्हलचा मनमुराद आनंद घेतला.

फेस्टिव्हलमध्ये उभारण्यात आलेल्या फूड स्टॉल्सनाही मोठा प्रतिसाद मिळाला. स्थानिक पदार्थांसह विविध खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी पर्यटकांनी रांगा लावल्या होत्या. तसेच महिला बचत गटांच्या विक्री स्टॉल्सनादेखील चांगला प्रतिसाद मिळून स्थानिक उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यासोबतच पर्यटकांनी वॉटर स्पोर्ट्सचाही आनंद लुटला.

व्यापाराच्या दृष्टीनेही हा फेस्टिव्हल यशस्वी ठरला असून, फूड आणि विक्री स्टॉल्समधून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली. यामुळे स्थानिक व्यावसायिक आणि बचत गटांना मोठा आर्थिक लाभ झाला आहे.

-----
डहाणू फेस्टिव्हलमुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळाली आहे. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदाचा फेस्टिव्हल विशेष गाजला. पुढील वर्षी हा फेस्टिव्हल अधिक भव्य करण्याचा निर्धार आहे.
-राजेंद्र माच्छी, नगराध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत गॅस सिलिंडरचा गोलमाल; परस्पर बुकींग नंतर आता डिलिव्हरी न मिळताच आला मेसेज...

चार दिवसांनी निर्माण होणारा गजकेसरी योग 'या' चार राशींना करणार मालामाल ! आनंदाचे दिवस होणार सुरू

Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT