मुंबई

घणसोलीत १४ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

CD

घणसोलीत १४ वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नवी मुंबई ता. २२ (वार्ताहर) : नवी मुंबईतील घणसोली येथे १४ वर्षीय विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रीत हरेराम रानकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

प्रीत रानकर हा घणसोली गावातील रानकर आळी येथे आपल्या पालकांसोबत राहत होता. तो स्थानिक नवी मुंबई सिटी स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. शुक्रवारी, २० मार्च रोजी सायंकाळी घरात कोणीही नसताना त्याने किचन आणि हॉलमधील पडद्याच्या रॉडला टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेतला. सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास त्याचे पालक घरी परतल्यानंतर प्रीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तातडीने उपचारासाठी वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी रबाळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, आत्महत्येमागील कारणाचा तपास सुरू आहे. अभ्यासाचा ताण, शाळेतील वाद किंवा मित्रमंडळींशी झालेल्या मतभेदांच्या अनुषंगाने पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. सध्या परीक्षेचे वातावरण असल्याने तणावातून हे पाऊल उचलले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेबाबत पालकांकडून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. मृत विद्यार्थ्याची आई भावना रानकर यांनी पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली आहे. आत्महत्येच्या कारणाचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीत गॅस सिलिंडरचा गोलमाल; परस्पर बुकींग नंतर आता डिलिव्हरी न मिळताच आला मेसेज...

चार दिवसांनी निर्माण होणारा गजकेसरी योग 'या' चार राशींना करणार मालामाल ! आनंदाचे दिवस होणार सुरू

Ashadhi Wari: आषाढी वारीत तीन जिल्ह्यांतील सर्व पालखी मुक्कामी ‘जर्मन हॅंगर’; सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यातील निविदांचे अधिकार सीईओंना!

''होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यास तयार, पण...''; ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा मोठा निर्णय

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT