............
पादुका दर्शनाचा अनुभव फारच भारावून टाकणारा होता. वेगळ्याच विश्वात आल्यासारखे वाटले. माझ्या कुटुंबासोबत मी इथे येऊ शकलो. हा सोहळा दरवर्षी असाच पार पडत राहो, अशी इच्छा आहे. सगळ्यांनी वेळ काढून येथे यावे आणि हे वातावरण अनुभवावे.
श्रेयस तळपदे, अभिनेता
---
देवदर्शन देवच घडवून आणतो. श्रेयस आणि मी आमच्या नातेवाइकांसोबत शिर्डीला जाणार होतो; पण सुट्टी नसल्यामुळे जाणे अशक्य होते. श्रेयसला अचानक सुट्टी मिळाली आणि आम्ही येथे आलाे. साईबाबांसोबतच २१ संत महात्म्यांचे येथे दर्शन झाले. हे साक्षात् परमेश्वरानेच घडवून आणले.
- दीप्ती तळपदे
............
हा अनुभव अविस्मरणीय आहे. अशा ठिकाणी आल्यावर नक्की जाणवते की आपल्या वर एक अदृश्य शक्ती आहे, जी आपल्याला सांभाळते. या भक्तिमय वातावरणात तल्लीन झाल्यावर आणि परमेश्वराच्या चरणी नतमस्तक झाल्यावर जाणवते की आपण या विशाल ब्रह्मांडात किती छोटे आहोत.
- शशांक केतकर, अभिनेता
.............
श्री पादुका दर्शन उत्सवाच्या ठिकाणी पाऊल टाकताच समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. हे शब्दांत सांगणे कठीण आहे. मुंबईकरांनी आणि सर्व भाविकांनी वेळ काढून नक्की येथे येऊन लाभ घ्यावा.
- कमलाकर सातपुते, अभिनेता
.............
या सोहळ्यात दर्शन घेऊन आम्हाला मनस्वी आनंद झाला आहे. हा साेहळा प्रत्येकाने प्रत्यक्ष अनुभवायला हवा. येथे आल्यावर एक वेगळीच शांतता लाभते. ही शांतता नव्याने उभे राहायला ऊर्जा देते.
- अंशुमन विचारे, अभिनेता
...............
खूप सुंदर पद्धतीने पादुकांचे दर्शन झाले. हा भक्तीचा महाकुंभ अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आयाेजित केला आहे. प्रत्येक संतांच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते; पण हा योग एकाच ठिकाणी साध्य झाला आहे. भाविकांनी येथे येऊन दर्शन घ्यावे.
- स्मिता गोंदकर, अभिनेत्री
.................
या ठिकाणी येऊन दर्शन घेताना वेगळीच ऊर्जा जाणवली. स्वामी समर्थांचे दर्शन घेताना खूप भावुक झाले. त्यांची मी मोठी भक्त आहे. माझ्यासाठी श्रद्धा आणि भक्ती खूप वैयक्तिक आहे. पादुका दर्शन साेहळ्यामुळे हा सुंदर योग घडून आला.
- प्रतीक्षा कोते, अभिनेत्री
............
सर्व संतांच्या पादुकांचे दर्शन घेता आले, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्यासाठी श्रद्धा आणि भक्ती केवळ मंदिरापुरती मर्यादित नाही. मी जे काम मनापासून आणि प्रामाणिकपणे करते, ते लोकांपर्यंत पोहोचून त्यांना आवडते, यातच माझी खरी भक्ती आणि श्रद्धा सामावलेली आहे.
- विदुला चौगुले, अभिनेत्री
..............
आनंदी आणि प्रसन्न वाटले. हा खूपच भक्तिमय अनुभव होता. कीर्तनकारांच्या गजर आणि भक्तीत तल्लीन झालेले दर्शन घेणारे लोक हे वातावरण मनाला शांती देणारे होते. हा अनुभव मी माझ्या पुढील वाटचालीतही सोबत घेऊन चालेल.
- शैला काणेकर, अभिनेत्री
.................
या वास्तूत पाऊल ठेवताच वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवली. मी मूळचा शिर्डीचा असूनही कामाच्या धावपळीत साई बाबांच्या दर्शनाला जायला वेळ मिळत नाही. माझी बाबांवर खूप श्रद्धा आहे. बाबा स्वतःच माझ्यासाठी मुंबईत आले आणि मला त्यांचे दर्शन झाले.
- गणेश जाधव, अभिनेते
----
आपल्या हिंदू धर्मात पादुकांना विशेष महत्त्व आहे. गुरूंनंतर त्यांच्या पादुकांचीच पूजा केली जाते. एकाच वेळी २१ पादुकांचे दर्शन ही खूप मोठी गोष्ट आहे. येथील अनुभव खूपच सुंदर आहे. भक्ती नसेल, तर काहीच नाही.
- स्मिता जयकर, अभिनेत्री
----
एकाच ठिकाणी २१ पादुकांचे दर्शन ही खूप मोठी आणि भाग्याची गोष्ट आहे. मनाला मिळणारी शांतता शब्दांत सांगता येणार नाही. माझ्यासाठी भक्ती ही मनातली भावना आहे आणि श्रद्धा येथे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसते. ही भावना, ही श्रद्धा प्रत्येकाने मनापासून जपली पाहिजे.
- अर्चना नेवरेकर, दिग्दर्शिका
-----
हा उपक्रम खूपच सुंदर आहे. आमचे अहोभाग्य आहे की २१ संत-गुरूंच्या पादुकांचे दर्शन एकाच वेळी, एकाच ठिकाणी घेता येते. तुम्हीही येथे नक्की येऊन दर्शन घ्या.
- रश्मी सोळंकी, निर्माती
----
परमेश्वरापर्यंत पाेहाेचण्याचे संत-सद्गुरू हे माध्यम असतात. कितीही ठरवले तरी सर्व संतांच्या दर्शनाला जाणे शक्य हाेत नाही. श्रीगुरू पादुका दर्शन साेहळ्यातून २१ संत आणि सद्गुरूंच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ मिळला आहे. हा दुर्मिळ याेग आहे.
- मिलिंद गवळी, अभिनेता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.