एकवीरा देवी यात्रेनिमित्त मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तीन दिवस टोलमाफी
खासदार सुरेश म्हात्रे यांची माहिती
भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) : लोणावळा येथील एकवीरा देवी यात्रेनिमित्त मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर तीन दिवस टोलमाफी जाहीर करण्यात आल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली. मंगळवार ते गुरुवारदरम्यान ही सवलत लागू राहणार आहे.
राज्यातील आगरी-कोळी बांधवांची कुलदेवता असलेल्या लोणावळा येथील एकवीरा देवीची यात्रा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवसांत पार पडणार आहे. या यात्रेनिमित्त मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर तीन दिवसांसाठी टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ घेण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे यांचे टोलमाफीसंदर्भातील अधिकृत पत्र आवश्यक असणार आहे. हे पत्र संबंधित टोलनाक्यांवर सादर केल्यास एकवीरा देवीच्या भक्तांना टोलमाफी मिळणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांनी दिली.
दरम्यान, द्रुतगती मार्गावरील टोल प्रशासनाने या टोलमाफीच्या मागणीस मान्यता दिली असून, ही सवलत सलग तीन दिवस लागू राहणार आहे. यात्रेसाठी जाणाऱ्या भक्तांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे तसेच सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहनही खासदार सुरेश म्हात्रे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.