मुंबई

रासायनिक सांडपाण्याने नाकीनऊ

CD

रासायनिक सांडपाण्याने नाकीनऊ
तारापूरमधील नाल्यातून विसर्ग, दुर्गंधीने नागरिक हैराण

बोईसर, ता. २३ (वार्ताहर) : तारापूर औद्योगिक क्षेत्रात रासायनिक सांडपाणी थेट नैसर्गिक नाल्यांमध्ये सोडले जात आहे. परिणामी, परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवर गेली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात कारखान्यांमधील सांडपाणी चेंबरमार्फत वाहून नेण्याची व्यवस्था आहे; मात्र चेंबर रासायनिक पाण्याने भरून ओसंडून वाहत असल्याने पाणी बाहेर पडत आहे. त्याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणीय नियम व कायदे केवळ कागदोपत्रीच राहिल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित प्रशासन व नियंत्रण यंत्रणा नेमकी कोणती भूमिका बजावत आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
--------------
आरोग्याशी खेळ
वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अन्यथा तारापूर परिसरात गंभीर पर्यावरणीय, आरोग्य संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची भावना स्थानिकांमध्ये वाढत आहे. संबंधित कारखान्यांवर कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VD Satheesan Kerala CM : केरळला नवे नेतृत्व; काँग्रेसकडून व्ही. डी. सथीसन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती

ACB Bribe Arrest : पुण्यानंतर आता नवी मुंबईत 'एसीबी'चा मोठा दणका; सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी 22 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटकेत

ChatGPT ने एका रात्रीत बनवून टाकलं करोडपती! केली 631 अब्ज रुपयांची कमाई, काय होती ट्रिक? पाहा

IPL 2026: विकेट तर गेलीच, पण सोन्याची चैनही पडली! RCB च्या ओपनरसोबत घडला अजब प्रकार अन् मग पडिक्कलने दाखवलं वेळेचं भान

Chandrakant Patil on Jayant Patil : सांगली-पेठ रस्ता न करणारे ‘शक्तिपीठ’ महामार्गावर बोलत आहेत, चंद्रकांत पाटलांनी जयंत पाटलांचा घेतला समाचार

SCROLL FOR NEXT