मुंबई

टाकाऊ अन्नातून खानपानची व्यवस्था

CD

टाकाऊ अन्नातून खानपानाची व्यवस्था
केळवेतील हॉटेल व्यावसायिकाकडून बायोगॅसचा वापर

पालघर, ता. २३ ः युद्धजन्य स्थितीमुळे हॉटेल व्यवसायिकांना अडचणींशी सामना करावा लागत आहे. गॅसच्या कमतरतेमुळे ग्राहकांसह कर्मचारीवर्गाच्या खानपानाची गैरसोय होत असल्याने केळवेतील हॉटेल व्यावसायिकाने टाकाऊ अन्नापासून बायोगॅसची निर्मिती केली आहे.
पालघर जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत असून मुंबई, ठाणेसह नाशिक व गुजरात राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. काही हॉटेल व्यावसायिक उरलेल्या अन्नापासून कंपोस्ट तयार करत असले तरी बहुतांश मंडळी राहिलेले अन्न हे उघड्यावर टाकतात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घंटागाडी किंवा कचराकुंडीत फेकून देतात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने केळवेतील निवांत हॉटेलचे मालक भूषण, चेतन सावे यांनी हॉटेल परिसरातच १,५०० लिटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प कार्यरत केला आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांदरम्यान शिल्लक राहणारे अन्न, कच्च्या भाज्या, इतर पदार्थांच्या वापरातून तयार होणाऱ्या गॅसचा वापर त्यांच्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात केला जातो. या प्रकल्पाने खाद्यपदार्थांचे वर्गीकरण करून बायोगॅस निर्मितीतून निसर्गाचे संवर्धन, स्वच्छता तसेच वापर किफायतशीर ठरत आहे.
-----------------------------
२० लिटर गॅसची निर्मिती
- हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडून किंवा एखाद्या समारंभात जेवण झाल्यानंतर शेकडो किलो अन्न, हिरव्या भाज्यांचा कचरा शिल्लक राहतो. हे टाकाऊ पदार्थ एकत्रित करून त्याचे पातळ द्रवमिश्रण केले जाते.
- गॅस तयार झाल्यानंतर प्रकल्पामधील टाकाऊ मिश्रण उत्तम खत म्हणून वापरले जाते. या प्रक्रियेतून महिन्याला सरासरी किमान २० लिटर गॅसनिर्मित होत असून एक ते दीड व्यावसायिक सिलिंडरची बचत होत असल्याची माहिती हॉटेलचे मालक चेतन सावे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयचा करिश्मा! बहुमत जुळवताना दमछाक, पण विश्वासमत ठरावात १४४ मते; DMKचं वॉकआऊट, नाट्यमय घडामोडी

Redbird Flight Training Academy: बारामतीतील रेडबर्ड फ्लाइट अकॅडमी पुन्हा चर्चेत; पाच वर्षांत अनेक विमान दुर्घटनांची नोंद, AAIB अहवालात धक्कादायक नोंदी!

सासरी गेल्यावर 'या' गोष्टीची सगळ्यात जास्त आठवण येईल... 'तुला जपणार आहे' फेम मीरा म्हणते- मला कधीच...

Gold Import Duty: सोने-चांदीवर 15% इम्पोर्ट ड्युटी! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार तब्बल इतके जास्त पैसे

Farmer Drowning: शेतीसाठी पाईप हलवताना काळाचा घाला; वसमत तालुक्यातील शेतकरी बुडून मृत, कालव्याच्या पाण्यात दोरी अडकली अन् अनर्थ घडला!

SCROLL FOR NEXT