देहरजी प्रकल्पग्रस्तांची आज बैठक
प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यावर ग्रामस्थ ठाम
विक्रमगड, ता.२३ (बातमीदार)ः देहरजी मध्यम प्रकल्पांतर्गत बुडीत क्षेत्रात जाणाऱ्या ग्रामस्थांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी सामूहिक बैठक होणार आहे. याबाबतचे अधिकृत पत्रक मनोरच्या पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उपविभागाकडून ग्रामपंचायतीना देण्यात आले आहे.
देहरजी मध्यम प्रकल्पामुळे ग्रामपंचायत साखरे अंतर्गत परिसरातील शेतकरी, नागरिकांच्या जमिनी प्रकल्पासाठी गेल्या आहेत. पण मोबदला, पुनर्वसन तसेच इतर तांत्रिक बाबींविषयी अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी खासगी जमीन संपादन मोबदला, पुनर्वसन प्रक्रिया व अनुषंगिक प्रशासकीय कार्यवाहीबाबत सविस्तर माहितीसाठी सामूहिक बैठक मंगळवारी (ता.२४) सकाळी अकरा वाजता साखरे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात होणार आहे. या बैठकीला सरपंच, ग्रामसेवक तसेच संबंधित ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ॉ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.