मुंबई

अंगणवाडी सेविकांना शाबासकी

CD

अंगणवाडी सेविकांना शाबासकी
विक्रमगड येथील कार्यक्रमात विशेष सत्कार
विक्रमगड, ता.२५ (बातमीदार)ः पालघर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक प्रकल्प अंगणवाडी सेविकांच्या मदतीने यशस्वीपणे राबवण्यात येत आहेत. त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने सिद्ध दत्त न्यास, पंचायत समिती विक्रमगड यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील १५२ अंगणवाडी केंद्रांमध्ये कार्यरत सेविकांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी सेविकांच्या सामाजिक बांधिलकीचा तसेच बालविकास क्षेत्रातील योगदानाचा सन्मान करण्यात आला. सिद्ध दत्त न्यास व पंचायत समिती विक्रमगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश पांढरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी विक्रमगड तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार वायाळ,संस्थेचे संस्थापक सुनील पाटणकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अर्जिता कुदरे, गटशिक्षणाधिकारी कासले, बालविकास प्रकल्प अधिकारी भोये, कृषी अधिकारी गये तसेच शीतल भांगरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT