मुंबई

राजपुरी खोकरी रस्ता बंद करण्याचा दिला इशारा !

CD

राजपुरी-खोकरी रस्ता बंद करण्याचा इशारा
अपूर्ण कामामुळे मच्छिमार बांधव आक्रमक; सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
मुरुड, ता. २३ (बातमीदार) ः राजपुरी कोळीवाडा परिसरातील मुख्य गटाराचे पाणी समुद्रात जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या साकवचे काँक्रीटीकरण केले होते. परंतु, हे काम संबंधित ठेकेदाराने अपूर्ण ठेवल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. येत्या आठ दिवसांत हे प्रलंबित काम पूर्ण न झाल्यास राजपुरी-खोकरी मार्ग कायमस्वरूपी बंद करण्याचा इशारा श्री महालक्ष्मी मच्छीमार सहकारी सोसायटीचे चेअरमन विजय गिदी यांनी दिला आहे यासंदर्भात मुरुड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदनात दिले आहे,
राजपुरी कोळीवाडा परिसरात मुख्य गटाराचे पाणी समुद्रात जाण्यासाठी साकवचे काँक्रीटीकरण केले होते. परंतु, संबंधित ठेकेदाराने संपूर्ण काम अर्धवट ठेवल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. साकवचे बांधकाम करताना ठेकेदाराने मुख्य पाणी जाण्याच्या मार्गावर दगड, माती, ठेवल्यामुळे पाणी याठिकाणी साचून रहात आहे. त्यामुळे या भागात घाणीचे साम्राज्य तयार झाले असून मच्छर निर्माण झाले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्याचप्रमाणे समुद्राच्या बाजूला खोदकाम करून दगड, माती तेथेच ठेवल्याने मच्छिमारांच्या नौका लोटताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार यांच्या निष्काळजीपणामुळे मच्छीमारां ना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे काम आठ दिवसांत पूर्ण करण्याची मागणी विजय गिदी यांनी केली आहे. अन्यथा राजपुरी-खोकरी मार्ग कायमस्वरूपी बंद करण्यात येईल. हा मार्ग बंद केला तर
राजपुरी, माझेरी व मुरुडमधील नागरिकांना रोहा येथे जाण्यासाठी जवळचा मार्ग बंद होणार आहे. त्यामुळे असंख्य प्रवाशांची कुचंबणा होणार आहे. याबाबत मुरुड बांधकाम विभागाने त्वरित कार्यवाही करून पूर्तता करावी, अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

महागड्या फेरारीतही हार्दिक ऐकतो 'हा' मंत्र; म्हणाला - "याहून पॉझिटिव्ह काहीच नाही!" पाहा Viral Video

इंडस्ट्रीतल्या 'या' अभिनेत्री आहेत एकमेकींच्या जाऊबाई; एक स्टार प्रवाहवर तर एक झी मराठीवर करतेय काम

Satara ZP News: महायुतीत ‘मिठाचा खडा’! साताऱ्याच्या राड्याने सत्ताधाऱ्यांत फूट? भाजप-शिंदे गटात अंतर्गत असंतोष उफाळला

खरातच्या पायाच पडणार! मला तो सारखं बोलवायचा, एकदा अर्ध्या वाटेत गेलो अन्...; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अनुभव

SCROLL FOR NEXT