विकासाच्या बाबतीत रोहा अव्वलस्थानी : अदिती तटकरे
रोहा, ता. २३ (बातमीदार) ः विकासाच्या दृष्टीने रोहे अष्टमी नगरपालिका अव्वल स्थानी आहे. शासनाच्या वैशिष्टपूर्ण योजनेअंतर्गत ‘नमो उद्यान’ कामाचे भूमिपूजन जिल्ह्यात सर्वप्रथमच रोह्यात होत आहे. तर पहिले क्लॉक टॉवरही उभे राहत असल्याने ही अभिमानास्पद बाब आहे. दुसरीकडे श्रीवर्धन नगरपालिकेने स्वच्छतेत कोकणात अव्वल स्थान पटकावले असून, आता राज्याच्या स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवू, असा विश्वास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
रोहा अष्टमी नगरपालिकेतर्फे रविवारी (ता. २२) फिरोज टॉकीज ते धावीर मंदिराकडे जाणाऱ्या रस्ता डांबरीकरणाचे कामाचे लोकार्पण, बायपास रोड येथे क्लॉक टॉवर आणि नमो उद्यानाचे भूमिपूजन अदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपाध्यक्ष अहमद दर्जी, मुख्याधिकारी अजयकुमार एडके, गटनेते महेंद्र गुजर, सभापती राजेंद्र जैन, महेंद्र दिवेकर, महेश कोलटकर, रवींद्र चाळके, निता हजारे, उपसभापती गौरी बारटक्के, शहर अध्यक्ष अमित उकडे, माजी अध्यक्ष सुभाष राजे आदी मान्यवर उपस्थित होते.
अदिती तटकरे म्हणाल्या की, नगराध्यक्षांच्या मागणीनुसार उद्यानच्या दर्शनी भागात स्टॉलसाठी ३५ ते ४० लाखांचा निधी उपलब्ध करुन देणार आहे. तसेच मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव पाठवल्यास शहरातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे नक्कीच प्रयत्न करणार असल्याचा दावा देखील अदिती तटकरे यांनी केला.
देशातील पहिले पेशवे स्मारक श्रीवर्धन शहरात
श्रीवर्धन शहराला आकर्षक समुद्र किनारा लाभल्याने नेहमी हजारो पर्यटक या ठिकाणी पर्यटनस्थळी येत असतात. राज्य शासनाच्या स्वच्छ शहर सुंदर शहर अभियान अंतर्गत श्रीवर्धन नगर पालिकेने जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकविला आहे. आता राज्यात प्रथम क्रमांक पटकविण्यासाठी प्रयत्नशिल आहोत. तसेच, देशातील पहिले पेशवे स्मारक श्रीवर्धन शहरात विकसित करण्याचा मानस असल्याचे अदिती तटकरे यांनी सांगितले.
फोटो कॅप्शन :
रोहा ः कोट्यवधींच्या कामाचे रोहा येथे आदिती तटकरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.