अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी
नागरिकांची प्रशासनाकडून कारवाईची मागणी
बोईसर, ता. २३ (वार्ताहर) : बोईसर-चिल्हार या महत्त्वाच्या मुख्य मार्गावर विराज कंपनी ते जुडिओ दुकानादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अवजड वाहने आणि दुचाकींचे अनधिकृत पार्किंग होत आहे. या प्रकारामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका निर्माण झाला असून, प्रशासनाने याबाबत ठोस कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
हा रस्ता जरी मोठा असला तरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभ्या असणाऱ्या बेकायदा पार्किंगमुळे हा मार्ग अक्षरशः अरुंद झाला आहे. अनेकदा वाहनचालकांना अत्यंत धीम्या गतीने येथून आपली वाहने न्यावी लागतात. यामुळे गाड्यांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडीसारखे चित्र येथे निर्माण होते. स्थानिक नागरिकांना या मार्गाचा वापर करताना खूपच सावधानतेने वापर करावा लागतो. रस्ता ओलांडायचा असेल किंवा या मार्गाचा वापर करायचा असेल, तर सर्व दिशांचा अंदाज घेऊन हा मार्ग वापरावा लागत आहे. लहान व ज्येष्ठ नागरिकांसाठी हा मार्ग वापरणे खूपच धोकादायकही ठरत आहे.
तारापूर एमआयडीसी, बोईसर, पालघर आणि चिल्हारकडे जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. असे असतानाही याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नाही. स्थानिक नागरिकांच्या मते, येथे वाहतूक पोलिसांची ये-जा असते, पण त्यांना हा प्रकार का दिसत नाही? येथील नागरिकांनी या मार्गावरील अनधिकृत पार्किंग तत्काळ हटवण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडे केली आहे. तसेच येणाऱ्या काळात येथे एखादी गंभीर घटना घडू शकते, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.