महिलांची आगोटीच्या पापडाची लगबग
ग्रामीण भागात सामूहिक श्रमदानाची परंपरा
तळा, ता. २३ (प्रतिनिधी) ः मार्च-एप्रिलमध्ये उन्हाचा कडाका वाढण्यास सुरुवात होते. याचदरम्यान ग्रामीण भागातील महिला आगोटीच्या कामात व्यस्त होतात. तळा तालुक्यातील गावागावांत सध्या उडदाचे पापड, कुरडया आणि इतर वाळवण तयार करण्याची कामे सुरू असून, महिलांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.
उन्हाळ्यात खेड्यापाड्यात पापड बनवण्याची मोठी तयारी असते. ग्रामीण भागात पाच ते दहा महिला एकत्र येऊन आळीपाळीने एकमेकींच्या घरी जाऊन ही कामे करतात. यामुळे कामाचा ताण न जाणवता मैत्रीपूर्ण वातावरणात ही कामे पूर्ण होतात. घरगुती पापडाची चव ही बाजारातील पापडापेक्षा वेगळी आणि चविष्ट असते. आजही ग्रामीण भागात पावसाळ्याची तरतूद म्हणून महिला हे पदार्थ आवर्जून बनवतात.
कोकणात पावसाळ्यात भातलावणीच्या कामांना सुरुवात होते. अशा वेळी जेवणाची चव वाढवण्यासाठी तळलेले किंवा निखाऱ्यावर भाजलेले उडदाचे पापड हा उत्तम पर्याय ठरतो. उपवास असो किंवा घरी आलेला पाहुणा, हे घरगुती पापड वेळेला उपयोगी पडतात, अशा महिला सांगतात.
उन्हाळ्यात घरगुती उडदाचे पापड करून घेतले की पावसाळ्यात, उपवासाला, पाहुणे आल्यावर याचा उपयोग होतो. पापड हे भारतीय जेवणात रोज
लागतात. एकमेकींच्या घरी आळीपाळीने गेल्यामुळे पापड सहज करता येतात. पिठ ठेवण्यापासुन ते पापड वळविण्यापर्यंत या गोष्टी एकमेकींच्या साहाय्याने सहज होतात.
-भारती भोसले, ज्येष्ठ महिला सोनसडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.