मुंबई

चारोटी नाक्यावर उन्हाचे चटके

CD

चारोटी नाक्यावर उन्हाचे चटके
बसथांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांना मनस्ताप

कासा, ता. २३ (बातमीदार) ः मुंबई-अहमदाबाद महामार्ग तसेच डहाणू-नाशिक राज्यमार्ग एकत्र येणाऱ्या चारोटी नाका परिसरात बसथांबा शेड नसल्याने उन्हाचे चटके खातच अनेकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे याठिकाणी तातडीने शेड उभारण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
चारोटी नाका परिसरातील प्रमुख वाहतूक केंद्रबिंदू आहे. आसपासच्या गावांतील नागरिक, शेतकरी, रुग्ण, तसेच शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने डहाणू व नाशिककडे प्रवास करतात; मात्र या ठिकाणी बस थांबण्यासाठी कोणतीही सुरक्षित व्यवस्था नसल्याने प्रवाशांना उन्हात, पावसात उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. पूर्वी डहाणू-नाशिक राज्यमार्गावर दोन्ही बाजूंना बसथांबा शेड उपलब्ध होती; पण महामार्गावर उड्डाणपूल व रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान ही शेड हटवण्यात आल्याने विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
----------------------------------
अडचणींशी सामना
चारोटी नाका परिसरात दुकानांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने प्रवाशांना उभे राहण्यासाठी जागा उरलेली नाही. त्यामुळे बसमध्ये चढताना, उतरताना अपघाताचा धोका वाढला आहे. मुंबई, गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी या ठिकाणी कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने उन्हातान्हात तसेच पावसात उभे राहून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे लहान मुले, वृद्ध, आजारी प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
-------------------------
डहाणू, नाशिककडे जाणाऱ्या प्रवाशांना चारोटी नाका येथे बसथांबा शेड नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- ॲड. आशीष चव्हाण, ग्रामस्थ
----------------------
पूर्वी येथे बसथांबा होता; मात्र अतिक्रमणामुळे हटवला गेला. ग्रामपंचायतीत ठराव करून नवीन बसथांबा उभारणीसाठी प्रस्ताव पाठवला आहे.
- भगवान तांडेल, माजी सरपंच, चारोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस

ग्राहक पैसे पूर्ण देतात, तर वापर न झालेला डेटा मध्यरात्रीच का रिसेट करता? टेलिकॉम कंपन्यांना राघव चड्ढांचा प्रश्न, ही डिजीटल लूट

SCROLL FOR NEXT