अन्यायाविरोधात वसईकर आक्रमक
जमावबंदीचा आदेश धुडकावत भूमिपुत्रांचा मोर्चा
विरार, ता. २३ (बातमीदार) ः वसईतील पोलिस यंत्रणा, भूमाफिया, बड्या विकसकांमधील घनिष्ठ संबंधांमुळे सामान्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. या अन्यायाचा निषेध करण्यासाठी वसईतील भूमिपुत्रांनी पोलिसांचा जमावबंदीचा आदेश धुडकावत आंदोलन केले.
वसई-विरारमध्ये भूमाफिया, धनदांडग्या विकसकांचे वर्चस्व वाढले असून पोलिस यंत्रणा त्यांच्या दबावाखाली किंवा हितसंबंधांमुळे सर्वसामान्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे. अनेकदा जमिनी बळकावणाऱ्या विकसकांविरुद्ध तक्रारीसाठी गेलेल्या शेतकऱ्याची दखल घेतली जात नाही. उलट हक्काची जमीन वाचवू पाहणाऱ्या मूळ जमीन मालकावरच खोटे गुन्हे दाखल केले जातात. अधिकारपदाचा अमर्याद वापर करून सामान्यांवर प्रतिबंधात्मक कारवाया किंवा हद्दपारीसारखी गंभीर पावले उचलली जात असल्याने भूमिपुत्रांच्या अस्तित्वावरच गदा आली आहे. त्यामुळे वसई-विरार जनशक्ती आघाडीचे मिलिंद खानोलकर, मॅकेन्झी डाबरे, अनिल चव्हाण, डॉमिनिका डाबरे, सुमीत डोंगरे, फादर मायकल जी, वेरोनिका रिबेलो यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भूमाफिया, विकसक, पोलिस यंत्रणेविरोधातील रोष व्यक्त करण्यात आला.
-----------------------
जनता दरबाराचे आश्वासन
नायगाव, जूचंद्र, वसई माणिकपूर, पेल्हार, सोपारा येथील पीडित नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. पोलिस उपायुक्त (झोन दोन) अधिकारी पौर्णिमा चौगुले यांनी आंदोलकांशी संवाद साधला. तसेच पोलिसांविरोधात तक्रारी असतील तर लेखी निवेदन देण्यात यावे. त्यावर तत्काळ चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच महिन्यातून एकदा पोलिस-नागरिक जनता दरबार भरवण्याचे आश्वासनही दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.