मुंबई

बामणदेव मैदानावरील फॉर्म्युला ४ ट्रॅकचा वाद पेटला

CD

वाशी, ता. २३ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २४ मधील बामणदेव मैदानावर सुरू असलेल्या फॉर्म्युला फोर रेसिंग ट्रॅक प्रकल्पावरून सर्वसाधारण सभेत तीव्र वाद निर्माण झाला. नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांनी या प्रकल्पावर जोरदार आक्षेप घेतला.

बामणदेव मैदान हे अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिकांसाठी क्रीडा, व्यायाम आणि शारीरिक तंदुरुस्तीचे केंद्र राहिले आहे. अशा महत्त्वाच्या सार्वजनिक मैदानावर रेसिंग ट्रॅक उभारण्याचा निर्णय घेताना स्थानिकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. नेरूळ गावावर सध्या ही परिस्थिती ओढवली असून भविष्यात इतर गावांवरही अशीच वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त करत त्यांनी हा प्रकल्प तत्काळ थांबवण्याची मागणी केली. तसेच रेसिंग ट्रॅकसाठी नेमके हेच मैदान कोणत्या निकषांवर निवडण्यात आले, पर्यायी जागांचा विचार का करण्यात आला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विकासाच्या नावाखाली सार्वजनिक क्रीडा सुविधा नष्ट होऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली.

अनिकेत म्हात्रे यांनी स्पष्ट केले, की पुनर्विकासाच्या आश्वासनांपेक्षा आधी मैदानाचे मूळ अस्तित्व टिकवणे महत्त्वाचे आहे. त्यांनी प्रशासनाला पारदर्शक भूमिका मांडण्याचे आवाहन करत नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची मागणी केली. गिरीश म्हात्रे यांनी प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात फॉर्म्युला फोर स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर संबंधित मैदानाचा सार्वजनिक क्रीडांगण म्हणून पुनर्विकास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

महागड्या फेरारीतही हार्दिक ऐकतो 'हा' मंत्र; म्हणाला - "याहून पॉझिटिव्ह काहीच नाही!" पाहा Viral Video

Satara ZP News: महायुतीत ‘मिठाचा खडा’! साताऱ्याच्या राड्याने सत्ताधाऱ्यांत फूट? भाजप-शिंदे गटात अंतर्गत असंतोष उफाळला

खरातच्या पायाच पडणार! मला तो सारखं बोलवायचा, एकदा अर्ध्या वाटेत गेलो अन्...; जितेंद्र आव्हाडांनी सांगितला अनुभव

Pune News : भोंदूगिरी करणाऱ्या बाबांची यादी ‘अंनिस’ पोलिसांना देणार

SCROLL FOR NEXT