मुंबई

पाळणाघर इमारतीचा वापर अभ्यासिकेसाठी करावा

CD

वाशी, ता. २४ (बातमीदार) : ​नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २६ अंतर्गत नेरूळ, सेक्टर ४८ येथील भूखंड क्रमांक ४३ वर बांधण्यात आलेले पाळणाघर गेल्या सहा वर्षांपासून उद्‍घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. २०२० मध्ये ही पाळणाघराची इमारत पूर्ण बांधून तयार झाली होती. २०२१ मध्ये ती समाज विकास विभागाकडे हस्तांतरितही करण्यात आली, मात्र सरकारकडून पाळणाघर संचालनाबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना नसल्याचे कारण पुढे करत पालिकेने हे काम प्रलंबित ठेवले होते. पाळणाघर सुरू होत नसेल, तर विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती अभ्यासिका सुरू करण्याची मागणीही आता पुढे येत आहे.

​आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून, महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून ‘मिशन शक्ती’ अंतर्गत ‘पाळणा’ योजनेच्या नवीन मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. यापूर्वी सप्टेंबर २०२४ मध्ये पाळणाघर सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या, परंतु लाभार्थ्यांकडून शुल्क आकारण्याचा प्रस्ताव असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी त्याला तीव्र विरोध केला, ज्यामुळे ती प्रक्रिया रद्द करावी लागली. त्यानंतर नवीन नियमावलीनुसार डिसेंबर २०२५ मध्ये पुन्हा निविदा काढण्यात आली, परंतु सुरुवातीला एकाही संस्थेने प्रतिसाद दिला नाही. मात्र ​प्रशासनाने हार न मानता फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये वारंवार मुदतवाढ देऊन निविदा प्रक्रिया राबवली. अखेर १२ मार्च २०२६ पर्यंतच्या मुदतवाढीत एकूण तीन संस्थांनी पाळणाघर चालवण्यासाठी आपले प्रस्ताव सादर केले आहेत.

कामाला गती
सध्या या संस्थांची तांत्रिक पात्रता तपासण्याचे काम प्रगत स्तरावर असून, पात्र संस्थेची निवड करून लवकरच हे पाळणाघर प्रत्यक्षात सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: धनगर आरक्षणासाठी मनोज जरांगे आझाद मैदनात! बोऱ्हाडेंना पाठिंबा; म्हणाले, सहा कोटी मराठे...

IPL 2026 Rule: आता 'चेंडू' अनफिट होणार, आयपीएल पाहताना मजा येणार! दुसऱ्या डावामध्ये कॅप्टन बॉल बदलण्याची मागणी करणार...

बीएमसीचा ऐतिहासिक निर्णय! हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार कायमस्वरूपी घर; पण कोणत्या? जाणून घ्या...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

Gas News : गॅस टंचाईमुळे ओतूर-माळशेज पट्ट्यात पुन्हा पेटल्या चुली

SCROLL FOR NEXT