मुंबई

एपीएमसीमध्ये पिवळ्या कलिंगडाची आवक

CD

तुर्भे, ता. २३ (बातमीदार) : कलिंगड म्हटले, की डोळ्यासमोर लालबुंद असलेले फळ उभे राहते; मात्र आता बाजारात पिवळ्या गराचे कलिंगडही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. वाशीतील एपीएमसी फळ बाजारात सध्या पिवळ्या कलिंगडाची मोठ्या प्रमाणावर आवक होत असून, ग्राहकांकडूनही त्याला चांगली पसंती मिळत आहे.

पिवळे कलिंगड हे दिसायला वेगळे आणि चवीला अधिक गोड असल्यामुळे बाजारात त्याची मागणी वाढताना दिसत आहे. यामध्ये साखरेचे प्रमाण तुलनेने जास्त असून ते आरोग्यासाठीही पोषक मानले जाते. त्यामुळे पारंपरिक लाल कलिंगडासोबतच अनेक ग्राहक आता पिवळ्या कलिंगडाला प्राधान्य देत आहेत; मात्र यंदा या फळाच्या बाजारपेठेवर आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम झाल्याचे चित्र आहे.

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे फळांची निर्यात मोठ्या प्रमाणावर घटली आहे. विशेषतः कलिंगडाची निर्यात ठप्प झाल्याने स्थानिक बाजारात आवक वाढली असून त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. वाशी एपीएमसी बाजारात सध्या रायगड, सोलापूर आदी भागांतून पिवळ्या कलिंगडाची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे; मात्र निर्यात बंद झाल्याने मालाची खप क्षमता कमी झाली असून, व्यापाऱ्यांना कमी दरात विक्री करावी लागत आहे.

भावामध्ये घसरण
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी पिवळ्या कलिंगडाला प्रतिकिलो ३० ते ३५ रुपये भाव मिळत होता; मात्र यंदा हा भाव घसरून २० ते २५ रुपये प्रतिकिलोवर आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित नफा मिळत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT