पालघर जिल्ह्यातील खेळाडूंचे यश
कासा (बातमीदार) ः महाराष्ट्र कराटे स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ ठाणे यांच्या वतीने ठाण्यातील नानजीभाई खिमजीभाई ठक्कर महाविद्यालयात राष्ट्रीय कराटे स्पर्धा उत्साहात झाली. या स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील निलय मर्देने एक सुवर्ण, एक रौप्यपदकासह चषक पटकावला. आस्तिक वैष्णवने दोन रौप्यपदके, एक चषक जिंकला, तर हिंदवी मर्देने एक सुवर्ण व एक रौप्यपदकासह चषक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. चार राज्यांतील २४२ निवडक खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला असल्याची माहिती स्पर्धेचे आयोजक नासिर मुलाणी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.