थकीत करवसुलीचा वाड्यात धडाका
वाडा, ता. २३ (बातमीदार) ः २०२५-२६ आर्थिक वर्ष संपत आल्याने उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी वाडा नगर पंचायतीने कठोर पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने विविध ठिकाणी नळजोडणी तोडण्यात आली आहे.
नगर पंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टी वसुली कमी असल्याने वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. शहरात वसुली पथकाकडून कारवाई सुरू आहे. मालमत्ताधारक मुदतीत कर भरणा करणार नाहीत, अशा मालमत्ता जप्ती करणे, पाणीपुरवठा खंडित करणे, थकबाकीदारांच्या नावांची यादी चौकाचौकांत जाहिरात फलकांवर लावण्यात येत आहे. तसेच थकबाकीदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगर पंचायतीतर्फे करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.