विजेच्या तारांचा घरांना गराडा
जव्हारच्या यशवंतनगर परिसरात नागरिकांचा संताप
जव्हार, ता.२३ (बातमीदार)ः जव्हार शहरातील यशवंतनगर परिसरात वीजवाहिन्यांची धोकादायक अवस्थेत आहेत. या परिस्थितीमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून लोंबकळणाऱ्या तारांमुळे शॉर्टसर्किट होण्याचा धोका वाढला आहे.
यशवंतनगरमधील गल्लीबोळांमध्ये वीजवाहिन्यांचे झाळे निर्माण झाले आहे. खांबांवर असंख्य वायर अनियमितपणे गुंडाळलेल्या असून त्यातील काही तारा घरांना खेटून आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, वीज खांबांजवळील काही उपकरणेही उघड्यावर असल्याने आग लागण्याचा धोका वाढला आहे. या परिसरात वीज शॉक लागण्याच्या तसेच किरकोळ आगीच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची भीती ज्योती लोखंडे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यशवंत नगर परिसरात धोकादायक पोल बाबत लेखी तक्रार आल्यानुसार त्याठिकाणी समक्ष जाऊन पाहणी करून ठेकेदाराला त्याबाबत माहिती दिली असल्याचे जव्हारच्या महावितरण कार्यालयाचे उपविभागीय अभियंता सुजित नाशिककर यांनी सांगितले.
---------------------------
पावसाळ्यात अपघातांचा धोका
यशवंतनगर दाट लोकवस्तीचा परिसर आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सतत वर्दळ असते. त्यामुळे नागरिकांनी अनेक वेळा महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे लेखी तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप केला आहे. पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता असून दुर्घटना होण्यापूर्वी संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.