ठाण्यात एकाच दिवशी वाहनचोरीच्या तीन घटना
दोन दुचाकी व एक रिक्षा लंपास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : शहरातील कळवा आणि कासारवडवली परिसरात एकाच दिवशी तब्बल तीन वाहनचोरीच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये चोरट्यांनी पावणे तीन लाखांच्या दोन दुचाकी आणि एक रिक्षा चोरून धूम ठोकली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रतिक केशरवाणी (वय २५) शनिवारी (ता. २१) रात्री सुमारे ८.३० वाजता फिरण्यासाठी हिरानंदानी इस्टेट येथे आले होते. त्यांनी आपली दुचाकी मढवी चौक येथील गार्डनसमोर पार्क केली होती. सुमारे ९.३० वाजता परत आल्यानंतर त्यांची दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले. दुसरी घटना, कोलशेत रोड येथील सुरज यादव (वय २४), यांनी हिरानंदानी इस्टेट येथे पार्क केलेली दुचाकी चोरीस गेल्याचे समोर आले. दोन्ही वाहनांची अंदाजे किंमत अनुक्रमे ७० हजार व १ लाख रुपये असल्याचे कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, तिसरी घटना कळवा पश्चिम भागात घडली. रिक्षाचालक रमाकांत भोईर (वय ३८) यांनी शनिवारी आपली रिक्षा चैत्रबन बंगला जवळ नेहमीप्रमाणे पार्क केली होती. मात्र, रविवारी (ता. २२) ते रिक्षा घेण्यासाठी गेले असता ती चोरीला गेल्याचे निर्दशनास आले. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या तिन्ही वाहनांची एकूण किंमत २ लाख ७० हजार रुपये असून संबंधित पोलिस पुढील तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.