मुंबई

कसाऱ्यात रेल्वेने बजावल्या अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा

CD

कसाऱ्यात रेल्वेचा बुलडोझर फिरणार?
दोन हजार घरे आणि दुकानांना नोटिसा; ग्रामस्थांचा संताप

शहापूर, ता. २३ (वार्ताहर) : मध्य रेल्वेच्या मुंबई कार्यालयामार्फत शहापूर तालुक्यातील कसारा बाजारपेठ आणि परिसरातील सुमारे दोन हजार घरे व दुकानांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. रेल्वेच्या या कारवाईमुळे हजारो कुटुंबे विस्थापित होण्याची भीती निर्माण झाली असून, संतप्त ग्रामस्थांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे.

कल्याण ते कसारादरम्यान रेल्वेच्या विकासकामांसाठी ही जागा रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र गेल्या ४०-४५ वर्षांपासून (१९८० पासून) अस्तित्वात असलेली ही घरे आणि दुकाने अचानक बेकायदा कशी ठरली, असा सवाल नागरिक विचारत आहेत. विठ्ठलवाडी, पंचशीलनगर, मिलिंदनगर, देऊळवाडी, निंगणवाडी, ठाकूरवाडी आणि पाटीलवाडी या हद्दीतील घरांचा रेल्वेने सर्व्हे सुरू केला आहे. त्यामुळे १५० टपरीधारकांसह एकूण दोन हजार व्यावसायिक व रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

लोकप्रतिनिधींना गावबंदी
रेल्वेच्या या निर्णयाविरोधात कसाऱ्यातील सिद्धेश्वर मंदिरामध्ये शुक्रवारी (ता. २०) कसारा बचाव कृती समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या वेळी ग्रामस्थांनी आपला संताप व्यक्त करीत ग्रामस्थ संकटात असताना लोकप्रतिनिधी गप्प बसल्याने त्यांना गावात येण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच रेल्वेच्या नोटिसांविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याचे निश्चित झाले. रेल्वेने नोटिसा बजावणे थांबवले नाही तर कसारा गाव बेमुदत बंद करून तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रशासनाविरुद्ध अविश्वास
रेल्वेची जागा नसतानाही केवळ दादागिरी करून प्रशासन नाहक त्रास देत आहे, असा आरोप समितीने केला आहे. राज्य सरकार या प्रकरणी मध्यस्थी करीत नसल्याने सत्ताधाऱ्यांविरोधातही लोकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. जर आमच्या डोक्यावरचे छप्पर हिरावून घेण्याचा प्रयत्न झाला तर संपूर्ण कसारा बंद ठेवला जाईल. आम्ही आमची घरे आणि दुकाने वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू, असा इशारा कसारा बचाव कृती समितीने दिला आहे.

कसारा गावातील रेल्वेलगतच्या दुकानदार व राहत्या घरांवर बुलडोझर फिरविण्याचा डाव आम्ही हाणून पाडू. त्यासाठी सत्याग्रही मार्गाने आंदोलनाची आम्ही तयारी करीत आहोत.
- सुहास जगताप, सचिव, कसारा बचाव कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस

ग्राहक पैसे पूर्ण देतात, तर वापर न झालेला डेटा मध्यरात्रीच का रिसेट करता? टेलिकॉम कंपन्यांना राघव चड्ढांचा प्रश्न, ही डिजीटल लूट

SCROLL FOR NEXT