उरण, ता. २३ (बातमीदार) : बंगळूरस्थित टेक्नॉलॉजी इन्फॉर्मटिक्स डिझाइन एंडेव्हर या स्वयंसेवी संस्थेच्या वतीने ‘मॉडेल स्कूल प्रोग्राम’अंतर्गत महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांमध्ये हरित शाळा उभारणीचे कार्य सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जागतिक जल दिनानिमित्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रविवारी (ता. २२) विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून पीरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या उपक्रमात रायगड जिल्हा परिषदेची आवरे शाळा, मोठी जुई, तसेच तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सुमारे १०० विद्यार्थी, दहा शिक्षक आणि सामाजिक संस्थेच्या आठ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करत प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन व वर्गीकरण केले. संकलित कचरा पुनर्वापरासाठी पाठविण्यात येणार असून ‘स्वच्छता व शाश्वततेचा’ संदेश देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.